अभिनंदन चंद्रपूर जिल्ह्यातील दारू बंदी हटवली, पुनर्वसनमंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती

मागील पाच वर्षांपासून सुरू असलेली चंद्रपुरातील दारूबंदी हटवण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला आहे
जिल्ह्यात दारूबंदी असतानाही अवैध दारू विक्री जोमात सुरू असल्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडते आहे, म्हणून जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याचे आश्वासन देणारे महा विकास आघाडी सरकार मधील आपत्ती व्यवस्थापन मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दारुबंदी हटवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. जिल्ह्यातील दारूबंदी चा अभ्यास करण्यासाठी दोन समित्या तयार करण्यात आल्या होत्या. नेमलेल्या समितीने आपला अहवाल जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्यामार्फत शासनाला सादर केला.

परंतु अचानक उद्भवलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर समितीच्या शिफारशींवर कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नव्हता.
मात्र आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तसेच या संदर्भातील नियम लवकरच घोषित होण्याची शक्यता आहे.

मागील 6 वर्षांपासून जनतेच्या प्रतिक्षेत असलेला निर्णय आज जाहीर झाला .मागील 6 वर्षात जिल्ह्यातिल गुन्ह्यात वाढ झाली आहे हे मात्र नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे.जिल्ह्यात तस्करी मोठ्या प्रमानात वाढली .या निर्णयानंतर गुन्हेगारी कमी होत बाजारातील रेलचेल वाढेल अशी अपेक्षा स्थानिक व्यापाऱ्यांकडून केली जात आहे. मे 2014 पासून चंद्रपूर जिल्ह्यात दारू बंदी केली होती. मात्र आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत दारूबंदी उठवील्याची माहिती मदत व पुनर्वसनमंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आता लवकरच प्रशासकीय पद्धतीने जिल्ह्यात दारूबंदी हटविण्यात येणार असून जिल्ह्यातील बियर बार मालक यांच्यासह बेरोजगार युवकांना व छोट्या दुकानदारांना आर्थिक मंदी तून आपली सुटका करून घेण्याची संधी मिळणार आहे.त्यामुळे जिल्ह्यात दारूबंदी उठवण्याची घोषणा होताच जिल्ह्यात मोठा आनंद व्यक्त होत आहे.