ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्य यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पदी नितीन सुधाकरराव खडसे यांची निवड

       

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225).

ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष पदी मेंघापूर येथील सरपंच नितीन सुधाकरराव खडसे यांची एकमताने निवड करण्यात आली.प्रदेश अध्यक्ष अजिनाथ धामणे,उप अध्यक्ष प्रमोद भगत,सचिव. विशाल लांडगे पाटील. महाराष्ट्र राज्य कार्यकारणी अध्यक्ष किशोर सुभाष चव्हाण. यवतमाळ जिल्हा अध्यक्ष विट्टल आडे,, आकाश जाधव,आरती जगताप. यांच्या उपस्थितीत
मा. नितीन सुधाकरराव खडसे सरपंच ग्रा.पं. मेंघापूर ता.राळेगाव जि. यवतमाळ यांची ग्राम संवाद सरपंच संघ यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पदी दि 06/05/2021 रोजी नियुक्ती करण्यात आली.नितीन खडसे यांच्या बहुआयामी नेतृत्वामुळे त्यांनी जिल्हाध्यक्ष पदी निवड झाली आहे.सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन सांभाळून त्यांच्या प्रत्येक समस्यांना वाचा फोडणारा नेता लाभल्याचे ग्राम संवाद सरपंच संघाच्या सदस्यांकडून बोलले जात आहे.