ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल प्रि स्कूल तर्फे चित्रकला स्पर्धेचे आयोजन बालवयात उपजत कलागुणांना वाव देणे व मुलांची विचारशक्ती वाढविने हा उद्देश

कलागुण हे उपजत असतात मात्र त्यांना योग्य व पोषक वातावरण मिळाल्यास ते गुण वृद्धिंगत होऊन चांगला कलाकार निर्माण होतो. बालकांमधे असलेले कलागुण शोधुन काढणे त्याला प्रोत्साहन देणे तसेच त्याच्या कलागुणांचा पालक तसेच समाजाला परिचय करून देण्याच्या उद्देशाने ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल प्रि स्कूल च्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक 5 ऑगस्ट पासुन प्रवेशिका स्विकारणे सुरू झाले असुन अंतिम तिथी 15 ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे. प्रवेशिका ऑनलाईन उपलब्ध असुन स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणार्‍या पालकांनी क्यू आर कोड स्कॅन करून आपल्या पाल्यांच्या प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सदर स्पर्धेसाठी कुठलेही प्रवेश शुल्क आकारण्यात येणार नसुन प्रथम पुरस्कार 3000 रुपये रोख, द्वितीय पुरस्कार 2000 रुपये रोख, तृतीय पुरस्कार 1000 रुपये रोख व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.