
सहसंपादक:- रामभाऊ भोयर
विधिमंडळ सदस्यांना आपल्या मतदार संघातील विकासाकरिता शासनाकडून निधी प्राप्त होत असतो. त्या निधी मधून विविध उपक्रम राबविले जातात. मा.ॲड श्री किरणराव सरनाईक, शिक्षक आमदार,अमरावती विभाग यांच्या विकास निधीमधून दिनांक 10जून रोजी राळेगाव तालुक्यातील अनुदानित शाळांना हरित फलकाचे वितरण करण्यात आले.
राळेगाव तालुका येथील 21 शाळांना एकूण 125, हरित फलकांचे वितरण करण्यात आले. हरित फलक वितरण कार्यक्रम तालुक्यातील अग्रगण्य शाळांमध्ये आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सन्माननीय संस्थाचालक, मुख्याध्यापक, तथा बहुसंख्येने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच अमरावती विभागीय शिक्षक संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये राळेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष सन्माननीय धर्मे साहेब तसेच सचिव डॉ अर्चना धर्मे ,प्राचार्य जितेंद्र जवादे, उप प्राचार्य विजय कचरे घाटंजी येथील शिक्षण प्रसारक मंडळ चे अध्यक्ष, प्राचार्य तथा सर्व शिक्षक गण इत्यादी उपस्थित होते.हरित फलक वितरण कार्यक्रमा दरम्यान बऱ्याच जणांनी मनोगतांमध्ये आश्चर्य व्यक्त केले. कारण त्यांना यापूर्वी शिक्षकांसाठी, शाळांसाठी विकास निधी असतो हे माहीतच नव्हते. व मा.श्री किरण सरनाईक यांच्या व्यापक स्वरूपात सर्वच शाळांना फलक वितरणामुळे सर्व मान्यवरांनी, मुख्याध्यापकांनी आनंद व्यक्त केला.
सर्व हरित फलक उत्तम दर्जाचे असून विद्यार्थ्यांचे अध्ययन व शिक्षकांचे अध्यापन सुलभ करणारे आहेत. त्यामुळे सर्वांनीच समाधान व्यक्त केले आहे.
मा. श्री किरण सरनाईक यांनी प्रत्येक कार्यक्रमात आजच्या विनाअनुदानित,अंशतः अनुदानित, शिक्षकांच्या समस्या,जुनी पेन्शन योजना,विद्यार्थी वैधता,सदोष संच मान्यता अशा अनेक समस्यांवर प्रकाश टाकला व आजपर्यंत ह्या समस्या सोडविण्यासाठी केलेले प्रयत्न याबद्दल विचार मांडले. भविष्यातही ह्या समस्या सोडविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करण्याची कटिबद्धता व्यक्त केली.
