सावळी मधे डेंग्यू चा कहर,स्वच्छतेकडे लक्ष द्या…. अन्यथा सावळी गावा प्रमाणे डेंग्यू जोर करेल: संजयजी डांगोरे

प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ,काटोल


रिधोरा ग्राम पंचायत अंतर्गत येणारे सावळी गावातील नाथजोगी बेड्यावर डेंगू चे पेशंट घरोघरीं आढळुन येत असल्याचे चर्चेमुळे पंचायत समीतीचे सदस्य संजयजी डांगोरे यांनी आज सकाळी 9 वाजता सावळी भेट देऊन संबधीत यंत्रनेला कार्यवाहीच्या सुचना दिल्या.
बेड्यावरील लोकांची रक्त तपासणी, औषधी वाटप, टेनीसाँस लिक्वीड टाकने, स्वच्छता आदी उपाया संदर्भांत बाबत माहीती देन्यात आली.
गाई, म्हशी, बकरी पाळणारी आणि त्यापासुन होेनार्या उत्पन्नातुन पोट भरणारी ही मंडळींना कोवीड लसीकरण आणि स्वच्छतेबद्दल सुचना देन्यात आल्या.

संजय डांगोरे यांचे सोबत समाजीक कार्यकर्ते जयंतजी टालाटुले, पंस.चे बीडीओ संजय पाटील, विस्तार अधीकारी लताताई चरपे , डॉक्टर नागपुरे , विजय डहाट, नलीनी गोंडाने, पत्रकार प्रशांतजी पवार, भुषन मुसळे, प्रविण टालाटुले, नर्स, आणि आरोग्य टिम उपस्थितीत होते.