प्रतिनिधी: प्रवीण जोशी,ढाणकी
दिनांक 16 तारखेला शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) चे वतीने ढाणकी येथील 33 के. वी. उपकेंद्र असलेल्या कार्यालयात शेतकऱ्यांना सुरळीत विद्युत पुरवठा व्हावा अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.
.. देशाचा आर्थिक कणा व संपूर्ण अर्थचक्र शेतकऱ्यावर अवलंबून असते नुकताच खरीप हंगाम संपून शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीला लागतात विद्युत वितरण कंपनीने लोड शेडिंग शस्त्र उगारले त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री बे रात्री कधी पण ओलीत करण्यासाठी जावे लागत आहे. आपला जीव धोक्यात घालून ओलीत करण्याचे काम शेतकरी करतो. इतके दिवस शेतकऱ्यांचा खरीप हंगाम असल्यामुळे सहसा ओलीत करण्याचे काम पडत नाही व त्यामुळे इतर नादुरुस्ती नेमकी कोणती हे लक्षात येत नाही. पण जसजसं ओलित खालील सिंचन बघता आता या सर्व बाबीना सामोरे जावे लागत आहे. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना सुरळीत विद्युत पुरवठा व्हावा यासाठी शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी विजय वैद्य, संभाजी गोरटकर, विशाल पाटील नरवाडे, गजानन खटके, दिलीप परतुडे, विक्रम शिराळे, अतुल, पराते, सतीश पराते आकाश शिंदे बंटी फुलकोंडवार, शैलेश करकले, इत्यादी शिवसैनिक(उद्धव ठाकरे) निवेदन देताना उपस्थित होते.