
सहसंपादक : रामभाऊ भोयर
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळमनेर येथील मुख्याध्यापक प्रदीप कामडी यांचे नियत वयोमानानुसार 58 वर्षे पूर्ण झाल्यामुळे, दिनांक 28 फेब्रुवारी 2026 ला सेवानिवृत्त झाले. त्यांनी या शाळेमध्ये साधारणतः 7 वर्षे अतिशय प्रामाणिक आणि उल्लेखनीय सेवा केली, तसेच गेल्याच वर्षी या शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या प्रतियोगीतेत तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळवून देण्यात अतिशय मोलाचे योगदान दिले. त्यांच्या अश्याच उल्लेखनीय कामगिरीमुळे शाळेमध्ये त्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमादरम्यान विस्तार अधिकारी हरिदास वैरागडे यांनी कामडी सरांच्या एकंदरीत कामगिरीला उजाळा देत त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. सदर निरोप समारंभाला यादव सर, गायकवाड सर, सौ येवले मॅडम, सौ सहारे मॅडम, वाघमारे सर, धामणे मॅडम, जामुनकर मॅडम, पूनम आत्राम मॅडम इत्यादी शिक्षक तथा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ रेश्मा नाने, आकाश वैद्य, पंकज राऊत, सरपंच निता मॅडम, मोहन नागमोटे, डोंगरे आणि इतर पालक यांची उपस्तिथी होती. सदर सोहळ्यादरम्यान उपस्तिथांनी कामडी सरांच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल आपापले मनोगत व्यक्त करून त्यांचे पुढील आयुष्य सुख समाधानाचे जाओ अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून त्यांना निरोप देण्यात आला.
