
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
आज दिनांक 31 मे 2026 रविवार रोज सायंकाळी गाव चौगान, ता. ब्रम्हपुरी, जिल्हा चंद्रपूर येथे जीवन शिक्षण सुसंस्कार शिबिर चे उद्घाटन पार पडले. शिबिराचे उद्घाटक म्हणून श्री सुबोध दादा, संचालक भु वैकुंठ अड्याळ टेकडी, अध्यक्ष म्हणून मा. खेमराज तिडके भाऊ, उपसरपंच श्री अंकुश भाऊ मातेरे, सुश्री रेखाताई कार्याध्यक्ष अड्याळ टेकडी, श्री किशोर पाटील तिडके, सेवमंडळाचे पदाधिकारी, आयुष आस्वले गुरुजी, प्रशिक्षक म्हणून पूजा-आरती दोनाडकर, गीत व समर्थ इत्यादी उपस्थित होते. याप्रसंगी दीपप्रज्वलन, वंदनीय तुकडोजी महाराज व पू तुकाराम दादा यांचे प्रतिमा पूजन, मान्यवरांचे मार्गदर्शन झाले. मार्गदर्शन करताना श्री सुबोध दादा यांनी सांगितले की अशा संस्कार शिबिरातूनच गावाचे आरोग्य, संस्कार, दिनचर्या, जीवनावश्यक शिक्षण, गाव संस्कृती, माणसातील सहकार्य वृत्ती, मानवता, श्रम प्रतिष्ठा, गाव स्वावलंबन, सामुहिकता, परस्पर संवेदनशीलता इत्यादी गोष्टींची जोपासना होऊ शकते.
