
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
वडकी कडून भरधाव वेगात येणारी इंडिगो कार त्रिमूर्ती मंगल कार्यालय समोर दुभाजकावर धडकल्याची घटना दिनांक २ जून २०२६ रोज मंगळवार ला रोजी घडली मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे आणि सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही
मिळालेल्या माहितीनुसार, वडकी येथून राळेगावकडे येत असलेली इंडिगो कार (क्र. MH 32 C 5664) अखिलेश मुजुमदार हे चालवत होते राळेगाव शहराती पोहोचण्यापूर्वीच त्रिमूर्ती मंगल कार्यालयासमोर कारच्या ब्रेक लाईनरमध्ये अचानक बिघाड होऊन ते जॅम झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.नियंत्रण सुटलेल्या वाहनाने प्रथम रस्त्याच्या डाव्या बाजूकडे झुकत वेग घेतला आणि त्यानंतर मधोमध असलेल्या दुभाजकावर आदळले. या घटनेची माहिती होताच पोलिस व नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले मात्र सुदैवाने जीवित हानी टळली या घटनेनंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिकांच्या मदतीने वाहन बाजूला करण्यात आले आणि वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.
