
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील खैरी येथे विद्युत करंट लागून एका ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. सदर घटना गुरुवार दिनांक १३ जुलै रोजी सकाळी उघडकिस आली. ही घटना वडकी पुलिस स्टेशन हद्दीतील खैरी या गावची असून या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
सुनिता मारुती इंगोले (४५) रा. खैरी असे विद्युत करंट चा झटका लागलेल्या मृतकाचे नाव असून. सुनिता ही मोल मजुरीचे काम करत असे आज गुरुवार रोजी सकाळी घरी झाडू पोछा चे काम करीत असताना घरी असलेल्या कुलरला हात लागून विजेचा करंट लागला त्यात तिचा मृत्यू झाला. ही घटना घडली त्यावेळी सुनीता घरात एकटीच होती.तिचे पती कामानिमित्त बाहेर गेले होते. मुलीचे लग्न झाले असल्यामुळे सुनीता पती मारुती इंगोले सोबत घरी दोघेच पती-पत्नी राहत होते . पती मारुती व सुनिता दोघे गुन्या गोविंदाने नांदत होते मात्र सुनिताच्या अशा अकाली निधनाने मारुती इंगोले यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सुनिताच्या अशा अकाली निधनाने खैरी गावात हळहळ व्यक्त होत आहे.
