
सहसंपादक : रामभाऊ भोयर
शहरासाठी अत्यावश्यक असलेली अठ्ठेचाळीस कोटी रुपयांची अमृत २.० अमृत पाणी पुरवठा योजना अंतीम टप्प्यात आली असून या संदर्भात सर्व शासकीय सोपस्कार पार पडले आहे येत्या दहा बारा दिवसांत या योजनेला अंतिम मान्यता मिळू शकते राळेगांव शहरासाठी अत्यावश्यक असलेली ही महत्वाकांक्षी योजना अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आली असून ही योजना कार्यान्वित होणार असल्याचे प्रतिपादन नगर पंचायत राळेगांव च्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आले
नुकत्याच झालेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात नगर पंचायत राळेगांव मधील पदाधिकारी यांनी हा महत्त्वाचा मुद्दा जिल्ह्याचे पालकमंत्री ना संजय राठोड यांना सांगीतल्यानुसार त्वरित या संदर्भात पत्र महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे अशी माहिती आज पत्रकार परिषदेत नगर पंचायतचे अध्यक्ष रविंद्र शेराम, उपाध्यक्ष जानराव गीरी यांनी दिली या योजनेसंदर्भात दोन गोष्टी महत्त्वाच्या होत्या एकतर या योजनेकरता पाणी आरक्षित होणे महत्त्वाचे होते आणि दुसरी म्हणजे राज्यस्तरीय तांत्रिक समितीची मान्यता मिळणे या दोन्ही गोष्टी पूर्ण झाल्याने आता केवळ प्रशासकीय मान्यता मिळणे बाकी आहे त्यामुळे लवकरच ही योजना मार्गी लागणार हे निश्चित पत्रकारांनी विचारलेल्या या विषया शिवाय इतर महत्वाच्या प्रश्नाची उत्तरे उपाध्यक्ष जानराव गीरी यांनी दिली ही महत्त्वाची योजना त्वरित मार्गी लावण्यासाठी नगर पंचायत राळेगांव च्या वतीने गेल्या दिड वर्षांपासून वेगळ्या पद्धतीने म्हणजे “गनिमी कावा” शिवसेना पध्दतीने राबवून ही योजना अंतीम टप्प्यात आणल्याबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे हे विशेष… या योजने करिता बेंबळा प्रकल्प येथून पाणी आरक्षित करण्यात आले आहे या योजनेकरिता जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी विशेष प्रयत्न केल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले या वेळी नगर पंचायतचे अध्यक्ष रविंद्र शेराम, उपाध्यक्ष जानराव गीरी, बांधकाम सभापती दिलीप दुदगिकर, काॅग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रदीप ठूणे, नगरसेवक कमलेश गैहलोत मोहिनी बोबडे ज्योत्स्ना राऊत ज्योत्स्ना डंबारे नलू शिवणकर सिमरन पठाण कविता कुडमते मधुकर राजूरकर व नगरपंचायत चे कर्मचारी उपस्थित होते
