
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत शाश्वत विकासाच्या नऊ थीम चे प्रशिक्षण राज्य व्यवस्थापन विभाग पुणे, जिल्हा परिषद यवतमाळ, पंचायत समिती राळेगाव व पंचायत राज प्रशिक्षण केंद्र खामगाव च्या संयुक्त विद्यमाने राळेगाव कोल्हे सभागृहात दिं १२ जानेवारी २०२३ रोज गुरुवारला शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,या प्रशिक्षणा अंतर्गत गावस्तरावरील अत्यंत महत्त्वपूर्ण घटक जबाबदार ज्यामधे सरपंच, उपसरपंच ग्रामसेवक मुख्याध्यापक अंगणवाडी सेविका
आशा डाटा एंट्री ऑपरेटर्स यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.गरिबीमुक्त व उपजिविका पोषक गाव आरोग्यदायी गाव बालस्नेहीपंचायत जलसमृद्ध गाव स्वच्छ गाव हरित गाव पायाभूत सुविधा युक्त गाव सामाजिक दृष्ट्या सुरक्षित गाव सुप्रशासन युक्त गाव महिलास्नेही गाव.
आमचा गाव आमचा विकास जि. पी. डी. पी. च्या माध्यमातून २०२३- २४ मध्ये बंधित निधीच्या माध्यमातून जलसमृद्ध गाव, स्वच्छ व हरित गाव आणि आरोग्यदायी गाव प्राधान्याने या थीम नुसार २४ एप्रिल २०२२ मध्ये ज्या ग्रामपंचायत नि भाग घेतला आहे. त्यांनुसार नियोजन करण्याकरिता मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ग्रामीण भागातील सर्वानगीन विकासाचा पाया मजबूत करण्याकरिता केंद्र शासनाकडून नियोजन बद्द कार्यक्रम आखला आहेत. या बाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे यावेळी
यवतमाळ जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंकज भोयर, गटविकास अधिकारी केशव पवार, विस्तार अधीकारी आर.एम. सुर्वे दिपक मस्के सर पंचायत विस्तार अधिकारी पेसा समन्वयक सवीता काठवटे पंचायत राज प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य अजय झाडोकर. राज्य प्रविण प्रशिक्षक देवीदास ढगे जिल्हा प्रविण प्रशिक्षक अरुण कांबळे,गजानन श्रीरामवार साहाय्यक अमोल डोरले, अनुराधा तुलसकार, शीतल खुरसाने आदी उपस्थित होते
