
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम
अध्यक्ष पदी विलास खोंड आणि कार्यवाह म्हणून दिलीप मॅकलवार तर कोषाध्यक्ष म्हणून धनंजय बोरकर यांची निवड करण्यात आली . महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची सभा 29 जुलै ला डाॕ.श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय चंद्रपुर येथे दुपारी 12 वाजता पार पडली. जिल्हा अध्यक्ष मधुकर मुप्पीडवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत नागपूर विभागाचे उपाध्यक्ष विनोदीजी पाढंरे आणी जिल्हा कार्यवाह रामदास गिरडकर उपस्थित होते.या वेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली. नंतर *म.रा.शि.प.चंद्रपुर जिल्हा ग्रामिण चे अध्यक्ष म्हणुन विलास खोंड (वरोरा ) आणि कार्यवाह म्हणुन दिलीप मॕकलवार (पोंभुर्णा ) तर कोषाध्यक्ष म्हणुन धनंजय बोरकर (सिदेंवाही ) यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. *उपाध्यक्ष सौ.मगंला डागंरे,श्री देविदास चवले,कार्यवाह मनोज पिपंळकर,अमोल रेवसकर,संघटणमंञी किशोर टेभुर्णे,महीला आघाडी प्रमुख कु.संध्या गिरडकर,कार्यालय मंञी विलास वरभे,प्रसिध्दी प्रमुख रांजेद्र मोहीतकर यांची जिल्हा कार्यकारणीत निवड करण्यात आली*.बैठकीला तालुका व जिल्हा तसेच विभाग पदाधिकारी ऊपस्थित होते. जिल्हाध्यक्ष मधुकर मुप्पीडवार ,कार्यवाह रामदास गिरटकर आणि नागपुर विभाग उपाध्यक्ष विनोद पांढरे ,तसेच जिल्हा आणि तालुक्याचे पदाधिकारी यांनी नवनियुक्त कार्यकारणी चे अभिनंदन केले आहे. या बैठकीला जिल्हातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीचे संचालन रामदास गिरटकर तर आभार श्री पिपंळशेन्डे यांनी केले.
