
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दिनांक १२ मार्च रोजी विर बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विर बाबुराव शेडमाके विश्रामगृहाजवळ त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
जयंतीनिमित्त यवतमाळ जिल्ह्यासह राळेगाव विधानसभा क्षेत्रातील आदिवासी बांधव तसेच सर्व धर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी विर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेचे पूजन करून शहरातून भव्य रॅली काढली.
या कार्यक्रमात शिवतीर्थ परिसरातील सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. प्रविण देशमुख यांनी स्वातंत्र्यलढ्यातील विर बाबुराव शेडमाके यांचे योगदान व कार्य यावर प्रबोधनपर व्याख्यान दिले. यानंतर आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारा भव्य दंडार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला तसेच विविध स्पर्धांतील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
यावेळी वसंत पुरके (माजी शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा प्रदेशाध्यक्ष आदिवासी काँग्रेस), प्रफुल्ल मानकर (जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी यवतमाळ),एन.झेड कुमरे , विठ्ठलराव मरापे,केशव तिरानिक, उत्तमराम गेडाम,प्रज्ञाताई पुरके, अरविंद वाढोणकर (जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल), माधुरी मडावी, रविंद्र शेरास नगराध्यक्ष नगरपंचायत राळेगाव , अँड सीमाताई तेलंगे,अँड अनिल किन्हाके, शोभाताई पारधी, शंकरराव कोयताडे नानाजी कोवे, महादेव मेश्राम, मधूकर पावले अंकुश मुनेश्वर, राजेंद्र तेलंगे,प्रकाश पोपट, सुधीर जवादे यांच्यासह इतर महिला, पुरुष आदिवासी बांधव व सर्व धर्मीय महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
