दगडाने ठेचून चुलत पुतण्याने केला मोठ्या आईचा खून,फरार आरोपीला पकडन्यात पोंभूर्णा पोलीसांना यश

पोंभूर्णा :- तालुक्यातील पोंभूर्णा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सोनापूर येथे सुनेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचे माहिती होताच आरोपी चुलत पुतण्याला जाब विचारण्यासाठी गेलेल्या पुतण्याने चुलत मोठ्या आईचा दगडाने ठेचून खून करून खुनाचा पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने शेणाच्या खड्यात टाकून फरार झाल्याची घटना आज दि.१० जुलैला दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली.पुष्पा मधुकर ठेंगणे वय ६२ वर्ष रा.सोनापूर असे मृतक महिलेचे नाव असून आरोपी धिरज रविंद्र ठेंगणे वय २० वर्ष रा.सोनापूर हा फरार आहे.

पोंभूर्णा तालुक्यातील सोनापूर येथील मृतकाची पिडीत सून हि शेतातून दुपारी घरी परत येत असताना आरोपी हा आपल्याच गुराच्या गोठ्याजवळ काम करीत असताना ओझा उचण्याच्या बाहाण्याने तिला बोलवून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता.मात्र ती कशीबशी प्रतिकार करून तिथून पळकाढून घरी येऊन सर्व आपबिती आपल्या सासूला सांगितल्यावर मृतक सासू त्याला जाब विचारण्यासाठी आरोपी कडे गेली असता आरोपी धिरज याने चुलत मोठ्या आईला दगडाने ठेचून तिचा खून केला.व पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तिला ओढत बाजूला असलेल्या शेणखताच्या गड्यात फेकून पसार झाला.घटनास्थळावर मुलगा गेला असता तिथे आई मृत अवस्थेत दिसली.सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. ग्रामीण रुग्णालय पोंभूर्णा येथे शवविच्छेदन करण्यात आले.पोलिसांनी फरार आरोपींवर भादवी कलम ३५४ ,३०२ नुसार गुन्हा दाखल केला असून काहि तासातच फरार आरोपीला पकडन्यात पोंभूर्णा पोलीसांना यश आले असून पुढील तपास ठाणेदार मनोज गदादे करीत आहेत