
मार्की येथे दि.21/ऑक्ट 2022
वेळ : सुमारे 2 वाजता विनोद रघुनाथ पोलशेटीवार यांचा ठेक्याच्या शेतात साप असल्याचे विनोद पोलशेटीवार यांना दिसून आला असता तत्काळ त्यांनी मुकुटबन चे MH 29 हेलपिंग हँडस चे सर्पमित्र व निसर्ग मित्र संदीप भाऊ धोटे व संतोष भाऊ गुम्मुलवार यांना फोन लावून बोलवले व ते दोघेही वेळेचा विलंब न लावता त्यांच्या टीम सोबत तात्काळ स्थळा वर पोहचले असता भारतीय अजगर जातीचा साप असल्याचे आढळून आले त्या अजगर जातीच्या सापाला कोणतीही इजा न होता पकडले हा साप ८.६ फूट लांबीचा असून त्याचे वजन १० किलो असून मादी अजगर असल्याचे सर्प मित्र यांनी सांगितले या सापाला वनरक्षक कुणाल सावरकर यांच्या मार्गर्शनाखाली मुकुटबन बिट मधी सोडण्यात आले . या वेळी सर्पमित्र व निसर्ग मित्र संतोष गुम्मुलवार, संदीप धोटे , ऋषी पुलीवार , अभिषेक,गोलू इत्यादी उपस्थित होते व MH 29 हेलपिंग हँडस सर्पमित्र संतोष यांनी साप विषय माहिती दिली या सर्प मित्रांच्या कार्या बद्दल सर्वत्र कौतुक होत असून सर्प मित्र कुठलीही फी न घेता साप पकडतात
