
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील कोच्ची येथे पाणीपुरवठ्याच्या विहीरीमधुन गढुळ पाणीपुरवठा होत असलेल्याने कोच्ची येथील ग्रामस्थांच्या तक्रारी निर्माण होत असल्यामुळे प्रत्येक्ष कोच्ची येथे वसंत पुरके माजी शिक्षणमंत्री यांनी जलजिवन मिशन अंतर्गत होत असलेल्या टाकीचे व विहीरीची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधुन येथे सर्वप्रथम जलशुद्धीकरण प्लांन्ट सुरू करुन योजनेचे काम हे अत्यंत दर्जेदार झाले पाहिजे असे सांगितले.यावेळी कोच्ची मधुकर जवादे, अंकुश गव्हाणकर, रविंद्र ठाकरे, नंदकिशोर गोफणे, शंकर जवादे, खैरी येथील सामाजिक कार्यकर्ते रविंद्र खैरकर, विनोद माहुरे, व गावातील इतर नागरिक,व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
