सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील कळमनेर येथील शाळा व्यवस्थापन समितीची निवड 10/1/2026 रोज शनिवारला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळमनेर येथे करण्यात आली त्यावेळी या निवडीला फक्त पंधरा लोक उपस्थित होते.शाळेत पटसंख्या 33 असल्याने कमीत कमी 25ते 30 पालक हजर असताना ही निवड व्हायला हवी अन्यथा कोरम अभावी सभा तहकूब करायला हवी होती.मात्र तसे न करता मुख्याध्यापक कळमनेर यांनी शाळा समिती स्थापन केली सोबतच शिक्षणप्रेमीची सुद्धा निवड केली.सोबतच ग्राम पंचायत सदस्याची निवड सुद्धा सदस्य म्हणून करण्यात आली. ही निवड फक्त पंधरा लोक उपस्थित असताना करून फक्त एकाच व्यक्तीला विचारून अध्यक्ष निवडले गेले त्यावेळी इतर सदस्य उपस्थित असताना इतरांना विश्वासात न घेता अध्यक्षांच्या नावाची घोषणा करण्यात आली.ही झालेली निवड आम्हाला मान्य नसून शाळा व्यवस्थापन समितीची फेर निवड करण्यात यावी या मागणीसाठी 4/1/2026 रोजी पालकांच्या सह्याचे निवेदन गटशिक्षणाधिकारी राळेगाव यांना देण्यात आले असून या प्रकरणाची चौकशी करून आम्हाला न्याय देण्यात यांवा अशी मागणी कळमनेरवासियांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
