
वडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बोरी ईचोड शिवारातील घटना
सहसंपादक : रामभाऊ भोयर
वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बोरी ईचोड गावातील कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा कुऱ्हाडीने घाव घालून खून केल्याची धक्कादायक घटना आज रविवार दिं.१ मार्च २०२६ रोजी सकाळी अंदाजे आठ वाजताच्या दरम्यान वडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बोरी ईचोड शिवारातून उघडकीस आली असून या याप्रकरणी पतीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पती ला काही वेळातच अटक करण्यात आली आहे.
मृतक पत्नी वैजयंतीमाला श्रीनिवास येलके वय ४५ वर्ष राहणार बोरी इचोड असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे तर श्रीनिवास येलके ५० वर्षे राहणार बोरी ईचोड आरोपी पतीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वैजयंतीमाला येलाके व श्रीनिवास येलके या पती-पत्नीचे घरगुती कारणावरून नेहमी वाद व्हायचे शनिवारी दुपारच्या दरम्यान वैजयंतीमाला व श्रीनिवास हे दोघे पती-पत्नी आपल्या मालकीच्या शेतात तुरी ठोकायला गेले होते व पत्नी तुरी ठोकत असताना पतीने नेहमीच्या वादातून सुटका मिळावी म्हणून पती श्रीनिवासने कुऱ्हाडीने पत्नीच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार तिचा खून केल्याची करून अपमानातून सुटका मिळावी म्हणून पती श्रीनिवासने कुऱ्हाडीने पत्नीच्या गळ्यावर वार करून तिचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. पत्नीचा खून करून आपल्यावर कोणी संशय येवू नये म्हणून श्रीनिवासने पत्नीचा मृतदेह तुरीच्या गंजी मध्ये लपून ठेवला व आरोपी श्रीनिवास फरार झाला मात्र पोलिसांनी काही तासातच आरोपीचा शोध घेतला असून श्रीनिवासला ताब्यात घेऊन पोलिसांना त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व या प्रकरणाचा उलगडा झाला घटनास्थळी वडकी पोलिसांनी भेट देऊन फॉरेन्सिक लॅब ला बोलावून घटनेचा पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनाकरिता राळेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार सुखदेव भोरकडे हे करीत आहे.
