सख्ख्या भाऊच ठरला भावाचा कर्दनकाळ केला खून


प्रतिनिधी ::प्रवीण जोशी
उमरखेड.


उमरखेड तालुक्यातील विडुळ ग्रामपंचायत मधील वांगी येथे दि 28 फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजताच्या दरम्यान सख्या भावानेच मोठ्या भावाला साळी कुटण्याच्या लाकडी अवजाराने (मुसळ) मारल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील वांगी येथे घडली सदर घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे भौतिक सुखामुळे मानवाने प्रगती केली खरी पण अशा पद्धतीने भाऊच एकमेकांचा कर्दनकाळ ठरत असतील तर कुठेही चिंताजनक बाब म्हणावी लागेल
मिळालेल्या माहितीनुसार मृतक गणेश माधव हातमोडे वय 45 वर्ष रा वांगी हा मनोरुग्ण असल्याने त्यांचे मानसिक संतुलन ठीक नसल्याचे सांगण्यात आले तो सतत वादवीवाद करत असे आज दि.28 फेब्रुवारी रोजी मृतक गणेश यांनी सख्ख्या भावासोबत वाद घातल्याने दोघात हातापायी झाल्याने बालाजी माधव हातमोडे रा वांगी वय 40 वर्षे याने रागाच्या भरात येऊन सख्ख्या भावालाच लाकडी अवजाराने मारून जागीच ठार केले व
मृतकाचे पार्थिव शरीर अंगणात खड्डा करून विल्हेवाट लावण्याची प्रयत्न सुरू असताना . गावकऱ्यांच्या लक्षात आले असता गावातील लोकांनी पोलीस पाटील गजानन मुलंगे यांना सदर घटनेची माहिती दिली तेव्हा पोलीस पाटलांनी घटनेची हाकिकत उमरखेड पोलीस स्टेशन येथे भ्रमणध्वनीद्वारे सांगण्यात आले त्याच क्षणी पोलिसांचा ताफा तालुक्यातील वांगी येथे पोहोचला व मारेकरी बालाजी माधव हातमोडे यांना उमरखेड पोलीस स्टेशन येथे अटक करून आणण्यात आले . दोन्ही भावांच्या झटापटीमध्ये लाकडी मुसळाने मृतकाच्या डोक्यावर छातीवर व हातावर जबर मार लागल्याने तो जागीच गतप्राण झाला.
मृतकाचे पार्थिव शरीर शवविच्छेदनासाठी उत्तरवार शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आले. पुढील तपास उमरखेड पोलीस करीत आहे .