
सहसंपादक : रामभाऊ भोयर
मुंबई उच्च न्यायालय नागपुर खंडपिठ तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती विनय जोशी यांनी राळेगांव येथे दिवाणी न्यायालय (वरीष्ठ स्तर ) स्थापन करण्याबाबतची प्राथमिक कार्यवाही सुरू केली असून त्यासंदर्भात विविध माहिती मागविली आहे. त्यांच्या कडून संबंधित सर्व बाबींचा विचार करून पुढची कार्यवाही केल्या जाणार आहे.
मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ येथे राळेगांव तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. प्रितेश वर्मा, आणि जेष्ठ विधीज्ञ ॲड मंगेश बोबडे, ॲड किशोर मांडवकर, ॲड मधुसूदन अलोने, ॲड मोहन देशमुख, ॲड चेतन गलाट यांनी मा. न्यायमूर्तींची भेट घेउन त्यांचे आभार मानले.
त्यामुळे तालुका वकील संघाच्या महत्त्वाच्या मागणीला पूर्ततेच्या दिशेने सकारात्मक संकेत मिळाले आहे.
वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय राळेगाव येथे आल्यानंतर अशील आणी वकिल यांना आणखी एक सुविधा आता येथेच मिळू शकणार आहे.
यवतमाळला जाण्याचा त्रास,वेल,श्रम,पैसा वाचू शकणार आहे.
