शहरातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांच्यावर तातडीने कारवाई करा: सरपंच संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सहसंपादक : रामभाऊ भोयर

आदिवासी विकास समाज संघटना राळेगाव तालुका तसेच केळापुर तालुक्याचे पदाधिकारी,यांनी
पांढरकवडा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे अधीकारी यांचेवर तातडीने कारवाई करण्याबाबतचे नुकतेच निवेदन जिल्हाधिकारी यवतमाळ यांना दिले आहे

एकात्मिक आदिवासी विकास पांढरकवडा प्रकल्प कार्यालयाचे गलथान व बेजबाबदार कार्य शैलीमुळे या तालुक्यातील आदिवासी समाजाचे विकासावर प्रतिबंध लागला आहे. प्रकलपाधिकारी यांच्या अवैध व बेकायदेशीर कामकाजाला लगाम घालण्यासाठी त्यांची चौकशी करून कार्यवाही करावी अशी निवेदनामार्फत विनंती करण्यात आली,
मोर्चातील मागण्या खालील प्रमाणे
1)आदिवासी विकासाकरिता
प्रकल्पाकडे येणारा विकास निधी कामाची निवड करून आर्थिक वर्षाचे आत विकास कामावर खर्च न केल्या बाबत.
2)आदिवासी विकास कामांना प्रशासकीय मान्यता देऊन सुधा वर्ष उलटून निधी उपलब्ध न करून दिल्यामुळे विकास कामे खोळंबली त्या बाबत कार्यवाही कारणे
3)आदिवासी समाज विकासा करिता जि.प.यवतमाळ यांनी निधीचा मागणी केली असता निधी उपलब्ध न करून देणे.कार्यकारी अभियंता यांनी १७/१०/२०२३ रोजी (पी.ओ.) ऑफिसचे संदर्भनुसर दी.३१/०३/२०२३ला बिडीएस वरून वापस गेलेल्या रक्कमा मिळण्याकरिता पी.ओ.ऑफिसला पत्र व्यवहार करून सुध्धा महिने उलटून गेले तरी आजपर्यंत कोनतीही कार्यवाही पो.ओ.ने केली नाही.
4)आदिवासी समाज विकास अंतर्गत आदिवासी अनु.आश्रम शाळा अंतर्गत बोगस विद्यार्थी संख्या दर्शवून करोडो रुपये अफरातफर केल्याबाबत.
5) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे कार्यालय विभागीय स्तरावरुन तालुका स्तरावर त्वरित देणे अशा मागण्या करण्यात आल्या
अन्यथा सरपंच संघटना तसेच समस्त आदिवासी समाज बांधव राळेगाव व केळापुर तालुका यांचे मार्फत दिनांकय २६/१२/२०२३ रोजी मा.उपविभागीय अधिकारी कार्यालय पांढरकवडा यांचे कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले
ह्यावेळी निवेदन देतांना पळसकुंड ग्रामपंचायत चे सरपंच वनिष घोसले तथा आदिवासी समाज संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते