
सहसंपादक. : रामभाऊ भोयर
आज दिनांक १४ जानेवारी २०२६ बुधवार रोज मकरसंक्रात निमित्य भू-वैकुंठ अड्याळ टेकडी येथे वार्षिक उत्सव व श्री गुरुदेव आपत्कालीन सेवा दल प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. दुपारी ०१.०० वाजता पंचक्रोशीतील गुरुदेवभक्तांसमवेत सत्संग भवन येथुन गुरुपद गुंफा व महासमधी पर्यंत भजन नामगजरात भव्य रामधून काढण्यात आली. श्री सुबोधदादा मार्गदर्शक व संचालक भु-वैकुंठ अड्याळ टेकडी यांच्या प्रमुख उपस्थितीत व श्री वाल्मीकजी वैद्य गुरुजी प्रांत सेवाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपविण्यात आला. कार्यक्रमाला सुधाकर गोवारदिपे वरोरा, श्री. लालचंदजी नखाते, मोखारा, श्री. बाबुरावजी ठवरे पारडी, यांनी विचार प्रकट केले. डॉ. नवलाजी मुळे अध्यक्ष अड्याळ टेकडी यांनी कार्यक्रमाचे संचालन व सुश्री. रेखाताई यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
सुबोधदादांनी त्यांच्या मार्गदर्शनात मकर संक्रातीला सूर्य मकर राशीत प्रवेश करून दिक्षिणायण संपवून उत्तरायण कडे प्रविष्ठ होतो असे सांगितले, दुःख, अज्ञान, अंधार म्हणजेच दिक्षिणायन व आत्मानंद, ज्ञान, वैराग्य, प्रकाश म्हणजे उत्तरायण होय. असे सांगून सुबोधदादांनी ग्रामसभा व पंचायत राज, मौन साधना शिबीर, आयुर्वेद, पंचगव्य व योग – निसर्गोपचार शिबीर इत्यादी उपक्रमाची माहिती दिली. श्री वाल्मिकजी वैदय गुरुजी, वरोरा यांच्या जन्मदिना निमित्य वैद्य परिवार तर्फे आजच्या कार्यक्रमाचे अन्नदान करण्यात आले. सर्वांनी वैदय गुरुजींचे स्वागत केले. नंतर श्री गुरुदेव आपत्कालीन सेवा दल या प्रकल्पाचे सर्व मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन व शुभारंभ करण्यात आले. शिवकालीन युद्धकला वस्ताद – श्री अक्षय कुळे गुरुजी व श्री जोशेष वाढई गुरुजी यांना या आपत्कालीन सेवादल प्रकल्पाचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले. या प्रकल्पासाठी सहयोग निधी कोश उभारण्या करिता अनेक कार्यकर्त्यांनी हजारो रूपयांचे आर्थिक संकल्प नगदी स्वरूपात सुपूर्त केले. त्यानंतर शांतीपाठ व प्रसाद वितरण करून सर्व कारकर्त्यांनी टेकडीवरील दगड स्थानांतरण करण्याचा श्रमदानाचा आदर्श पायंडा, कायम केला, सर्वांनी भोजन – महाप्रसाद घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
