[सायकल3, मोबाईल5, स्टडी टेबल 7, फॅन5, छोटे स्टडी टेबल 10, खुर्ची 10, स्कूल बॅग 20,छत्री 10, सह प्रत्येक सहभागीला बक्षीसाचे वाटप ]
[

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव येथील अण्णाभाऊ साठे, प्रभाग क्र 5 येथे या वर्षी तान्हापोळा उत्साहात पार पडला.पहिल्यांदा या वर्षी पोळ्याचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते. अनेक कल्पक नंदी सजावट करून चिमुकल्यानी उपस्थित्यांच्या डोळ्याचे पारणें फेडले. या वेळी उत्कृष्ट नंदी सह सर्व सहभागी चिमुकल्यांना बक्षीसांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
मातीचा नंदी,उत्कृष्ठ नंदी, उत्कृष्ट बासिंग, उत्कृष्ठ सजावट, वेशभूषा, नावीन्यपूर्ण या विविध प्रकारात प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पाचवे व सहावे बक्षीस देण्यात आले. निवड समिती द्वारे या प्रकारतील स्पर्धेकांची एकमताने निवड करण्यात आली. स्टडी टेबल, चार मोबाइल,फॅन,पाच चेअर,10 छत्री, या सह प्रत्येक सहभागी नंदी सजावटी साठी ला विविध खेळणी बक्षीस देण्यात आली.
*तहसीलदार अमित भोईटे ठाणेदार सीताराम मेहत्रे यांनी मनोगत व्यक्त करतांना अतिशय दर्जेदार आयोजन करून एव्हडा भव्य नंदीपोळा आयोजित करण्यात आल्या बाबत आयोजकांचे कौतुक केले. या वेळी रमेशभाऊ कन्नाके, सुरेशभाऊ वर्मा, संजयभाऊ बोथरा, सुरेशभाऊ बोथरा,संजयभाऊ मुथा,विनयभाऊ मुनोत,डॉ कुणाल भोयर ,प्रतीक बोबडे, शशिकांत उर्फ बाळू धुमाळ,गोवर्धन वाघमारे,युवराज जी पाईकराव,अरविंद तामगाडगे, मानकर सर, गिरीधर ससनकर,भुपतभाऊ कारिया,मामा चांदे, मेंडोले काकाजी, ऍड. रोशनी वानोडे,मुर्तझा बबर, होजफा बबर ,दर्शन मुनोत,रुपेश बोरकुटे, यश मूथा, पराग मानकर,संदीप पेंदोर,प्रकाश वर्मा, नामदेव गवारकर, देवघरे काका, निलय घिनमिने.निकेत भलमे,निखिल राऊत,योगेश मलोंडे,श्रीकांत कोदाने,कैलास धतकर,प्रेमा अत्राम, हिरा आटे, दिलीप नगराळे, गबर कुरेशी, साहिल नगराळे, अक्रम पठाण, दर्शन मुनोत, गजानन खडसे, मनोज पायघन, विजय केवटे,नाना आव्हाड,सोनू पोपट,यांचे सह मान्यवरांचे हस्ते बक्षीसांचे वाटप करण्यात आले.
शशिकांत उर्फ बाळू धुमाळ मित्र परिवाराच्या वतीने या नंदीबैल पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रभागातील नागरिकांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. बहुसंख्य नागरिक यात सहभागी झाले. प्रत्येक सहभागीला बक्षीस देण्यात आले.
