
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
चौथी नवोदित आदिवासी साहित्य परिषद रविवार दिनांक 3 मे 2026 ला यवतमाळ येथे आयोजित केली आहे ही परिषद सेंट्रल सेलिब्रेशन हॉल मेडिकल चौक यवतमाळ येथे होत आहे. “समाजातील वेदना दुःख दारिद्र्य अन्याय अत्याचार याला वाचा फोडण्याचे काम साहित्य करत असते, सोबत मानव समाजाची संस्कृती जतन करण्याचं काम सुद्धा साहित्य करत असते. मानवी समाजामध्ये दिवसेंदिवस वाचन प्रक्रिया कमी होत आहे. मागील इतिहास वाचल्याशिवाय पुढील इतिहास घडविता येत नाही, म्हणून वाचन प्रक्रिया वाचन संस्कृती गतिमान करण्यासाठी ह्या नवोदित आदिवासी साहित्य परिषदेचे प्रामुख्याने आयोजन करण्यात येत आहे. चार सत्रात ही परिषद होत असून उदघाटन सत्रात संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. तुकाराम रोंगटे,पुणे विद्यापीठ पुणे. यांचे प्रामुख्याने भाषण होणार आहे. या साहित्य परिषद संमेलनाचे उद्-घाटन प्रा. डॉ. संजय लोहकरे यांचे हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून यशोदाताई आत्राम ज्येष्ठ साहित्यिक, तथा बाळकृष्ण गेडाम ज्येष्ठ साहित्यिक, राजूभाऊ मडावी उपशिक्षणाधिकारी डॉ. अरविंद कुडमेथे वैद्यकीय अधिकारी, पैकूजी आत्राम आदिवासी सेवक,शंकरराव मडावी वनधिकारी, यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.या सत्राचे बीज भाषण कवयित्री प्रा. शीतल ढगे साहित्यिका करणार आहे, प्रास्ताविक प्रा. डॉ. वसंत कनाके मांडणार असून, सूत्र संचालन अड्होकेट अरविंद सिडाम यांचेकडे आहे. पाहुण्यांचे परिचय वाचन कवयित्री प्रा. संगीता मसराम मांडणार आहे. पाहुण्यांचे स्वागतासाठी प्रा. मोहिनी कुडमेथे आणि त्यांची चमू स्वागत गीताचे सादरीकरण करणार आहे. सत्कार संचालन डॉ. विलास कन्नाके व विद्या परचाके हे करतील. या पहिल्या सत्रातील पाहुण्यांचे आभार जयश्री मडावी मानणार आहेत. दुसऱ्या सत्रात: विषय: “नवोदित आदिवासी साहित्याची दिशा आणि सांस्कृतिक व राजकीय भूमिका” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन होणार आहे. या सत्राचे अध्यक्ष: प्रा. डॉ. माधव सरकुंडे ज्येष्ठ साहित्यिक,हे राहणार असून, प्रमुख वक्ते म्हणून मा. बाबाराव मडावी ज्येष्ठ साहित्यिक, प्रा. डॉ. चिंतामण धिंदळे ज्येष्ठ साहित्यिक पनवेल, डॉ. ऋषिकेश किनाके वैद्यकीय अधिकारी, यांचे सखोल मार्गदर्शन होणार आहे.या दुसऱ्या सत्राचे प्रास्ताविक :प्रा. रामचंद्र आत्राम करणार असून, पाहुण्यांचे परिचय वाचन प्रा. नितीन टेकाम करणार आहेत. सूत्र संचालन :मधुसूदन कोवे,हे सूत्रसंचालन करणार आहेत.सदर सत्राचे सत्कार संचालन : श्रीराम कुमरे लीना बोरकर नंदा आत्राम, तसेच पाहुण्यांचे आभार विद्या परचाके मानणार आहेत. तिसऱ्या सत्रामध्ये आदिवासी समाजातील साहित्यिक तथा समाजसेवक यांचा सत्कार, पुरस्कार आणि “आदिम हुंकार” (समीक्षा )ग्रंथ प्रा. वसंत कनाके “या ग्रंथाचे प्रकाशन होईल आणि भोजन अवकाश राहील. चौथ्या सत्रा मध्ये कवी संमेलन कवी संमेलनाचे भव्य आयोजन केले आहे. अध्यक्ष म्हणून प्रब्रम्हानंद मडावी ज्येष्ठ साहित्यिक, उद्घघाटक म्हणून रजनी पोयाम ज्येष्ठ साहित्यिकl,या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन प्रा. विजय चांदेकर ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत करणार आहे. कविता सादरीकरण साठी दिग्गज कवी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या सत्रातील पाहुण्यांचे सत्कार संचालन प्रा. संगीता मसराम तर आभार : धनराज मसराम मांडणारे आहेत. नवोदित आदिवासी साहित्य परिषद समिती यवतमाळ पदाधिकारी व सदस्य :वसंत कनाके, रामचंद्र आत्राम, विद्या परचाके, जयश्री मडावी,श्रीराम कुमरे,बाळकृष्ण गेडाम, राजू मडावी, एडवोकेट अरविंद सिडाम, डॉ.अरविंद कुडमेथे, राजेश ढगे, विलास कनाके, धनराज मसराम, विनोदकुमार आदे, दत्ता गावंडे, प्रभात कनाके, लीना बोरकर, रंजनी पोयाम, अशालता कोवे,नंदा आत्राम, शितल ढगे, रामदास आत्राम,सुरज मरस्कोल्हे, गौरव पंधरे,विजय चांदेकर, शालिक कनाके, ब्रह्मानंद मडावी,सुरेश किनाके, संगीता मसराम, प्रवीण टेकाम, संदीप आत्राम, प्रेरणा कनाके, मधुसूदन कोवे,पुरुषोत्तम घोडाम,विकास उईके,गौरीनंदन कनाके. यांनी कळविले आहे.
