
सहसंपादक : रामभाऊ भोयर
शेतकऱ्याचे पंचप्राण युगात्मा शरद जोशी यांनी जीर्णोद्धार केलेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगाव तालुक्यातील रावेरी येथील प्राचीन सीता मंदिर परिसरात सीतानवमीच्या पावन पर्वावर ०५ मे २०२५ सोमवार ला दुपारी १.०० वाजता स्वयंसिद्धा सीता सोहळ्याचे आयोजन केले आहे.
या सोहळ्यात महाराष्ट्रातील सात महिलांना स्वयंसिद्धा सीता सन्मान प्रदान केला जाणार आहे. सीतानवमी दिनी प्राचीन सीता मंदिर प्रांगणात होणाऱ्या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र झोटिंग व आयोजकांनी केले आहे.
ज्या महिलांनी पतीच्या निधनानंतर किंवा घटस्फोटानंतर हिंमत न हारता संयमाने विपरीत परिस्थिती व समाजव्यवस्थेशी संघर्ष करून आपल्या पाल्यांना लवकुशांप्रमाणे पायावर उभे करून आत्मनिर्भर, समाजातील प्रतिष्ठित व सन्माननीय नागरिक म्हणून घडवले आहे, अशा कर्तृत्ववान धैर्यशील मातांचा भावपूर्ण सत्कार करण्यात येणार आहे. यावर्षी १) श्रीमती रोहिणी शशांक सावजी
रा. नागपूर जि. नागपूर २) श्रीमती अंजनाबाई लटारी काठे
रा. बिबी, ता. कोरपना जि. चंद्रपूर ३) श्रीमती पूर्वा सुधीर देशपांडे
रा. राजुरा ता. राजुरा जि. चंद्रपूर ४) श्रीमती उज्वला दिलीप मांढे
रा. नागपूर जि. नागपूर ५) श्रीमती वंदना मनोज कुबडे रा. वर्धा, जि. वर्धा ६) श्रीमती संगीता सुनील मोहितकर रा. वरोरा ता. वरोरा, जि. चंद्रपूर ७) श्रीमती प्रणाली शत्रुध्न बावणे रा. नागपूर जि. नागपूर, या सात कर्तबगार महिलांना स्वयंसिद्धा सीता पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप राहणार असून उद्घाटक शेतकरी संघटनेचे नेते व माजी आमदार सरोजताई काशीकर, प्रमुख अतिथी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. ललितदादा बहाळे, शेतकरी महिला आघाडीच्या प्रज्ञाताई बापट, स्व.भा. प. अध्यक्ष अनिलदादा घनवट, दिनेशजी शर्मा, शैलाताई देशपांडे,सिमाताई नरोडे,मधुसूदन हरणे, सतीश दाणी, शेतकरी संघटना जिल्हाप्रमुख राजेंद्र झोटिंग, सोनाली मरगडे जिल्हाध्यक्ष महीला आघाडी,गणेश मुटे रावेरी चे सरपंच राजेंद्र तेलंगे, वर्षा तेलंगे,नारायणराव काकडे,बाळासाहेब देशमुख,नामदेवराव काकडे आहेत. सोहळ्याला महिला व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शेतकरी संघटना महिला आघाडी, हनुमान देवस्थान ट्रस्ट, सीता नवमी महिला उत्सव समिती, ग्राम पंचायत कमिटी रावेरी, महिला बचत गट, रावेरी, महिला वारकरी भजन मंडळी, रावेरी यांनी केले आहे.
