भूमाफियांचे विस्तारित असलेले जाळे, वाढत असलेल्या भूखंडाच्या किमती व दलालांचा सुळसुळाट


प्रतिनिधी, प्रवीण जोशी.
ढाणकी.


धनसंपत्तीच्या बळावर हल्ली भूखंड माफीयांनी महसूल यंत्रणा उपनिबंधक व जिथे जिथे सरकारी काम आहेत त्या कार्यालयातील कर्मचारी दलाल व प्रसंगी गुंडप्रवृत्ती व उरलेसुरले राजकारणी यांना खिशात घालून फिरताना दिसत आहे. अवैध कामांना गैरपद्धतीने कायदेशीर स्वरूप आणण्याचा आव आणून माया कमवतात. आणि सार्वजनिक जीवनात मोठेपणात मिळवणारी मंडळीची काही वाणवा किंवा उणीव अजिबात नाही. रियल इस्टेट अर्थातच भूखंड हा एक मात्र असा धंदा आहे की त्यामध्ये पैसे गणिती हिशोबाने सांगावयास झाल्यास गुणाकाराने पैसे वाढतात त्यामुळे असंख्य पांढरपेशी या व्यवसायामध्ये अगणित फोफावले आहे. व यातूनच भूखंड माफिया यांची सर्व शहरात रेलचे ल निर्मिती झाली. व त्यांचे जाळे शहराच्या अनेक ठिकाणी खोल मुळापर्यंत रुजलेली दिसतात. अंदाजे दहा ते पंधरा वर्षे पूर्वी जमिनीला म्हणावा तेवढा भाव नव्हता शहरात व खेडे गावात सुद्धा अगदी काही किमतीत जमिनी मिळत होत्या त्यामुळे शेत जमीन व्यवहाराकडे फारसे कोणी ध्यान देत नव्हते पण या बाबीमुळे भूमीमाफिया चे जग त्यावेळी सुद्धा कार्यरत होते पण आता जशी चर्चा आहे तशी त्यावेळेस ही चर्चा नव्हती तसेच माफीयाची त्या क्षणी काम करण्याची प्रथा वेगळीच होती काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा वर्ग क्रमांक१किंव्हा क्रमांक 2 जरी पदनियुक्ती असेल व थेट मंत्रालयापर्यंतच्या चालणाऱ्या यंत्रणे बरोबर संबंध प्रस्थापित केल्या जातात अनेक शहरातील प्रचंड गजबजलेल्या मोक्याच्या ठिकाणचे भूखंड अत्यंत कमी भावात खरेदी करायचे व सरकारी नियमांना फाटा देऊन त्यातून प्रचंड पैसे कमवायचे व आर्थिक उलाढालीतून सगळ्यांची आर्थिक उन्नतीचामार्ग व स्रोत बनत आहे. व “एक मेका सहाय्य करू” प्रथा व परंपरा रूढ होताना दिसत आहे. अगदी मधुर भाष्य करून काम करण्यात हातखंड असल्याने त्यांचे काळेबेरे सर्व सामान्य भोळ्याभाबड्या माणसाला समजत नाही भरपूर अर्थप्राप्ती होत असल्याने सर्वच कार्यालयातील अधिकाऱ्यांचा या उद्योगीचा पाठिंबा असतो अनेक सर्वसाधारण लोकांची फसवणूक सुद्धा होते पण पैशापुढे आणि सत्तेपुढे शहाणपण मुळीच चालत नाही हे सर्वश्रुत आहे महसूल विभागातील काही लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यामुळे सर्वच ठिकाणी दलालांचे व माफीयांचे धाडस वाढलेले दिसते. बऱ्याच ठिकाणी चुकीचे कागदपत्र असताना शासकीय यंत्रणेला हाताखाली धरून प्रचंड पैसा कमविला यातून दलालांची चकाकणारी घरी झाली कार्यालय झाली यातच सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती भांबाबवून जातो. यातून दलालाची मजल मात्र वाढली. भांडण व तंटे असलेले भूखंड मालकांना शोधून त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांसोबत व दलाला ंकडे नेऊन मिलीभगत करून जमिनीचा खोट्या विक्रीचा व्यवहार करून सत्य बाहेर आल्यानंतर वाद उपस्थित करून बेकायदेशीर व अवैधरित्या ताबा करायचा व फसेगिरीचा धंदा सुरू केला असून याला वेळीच लगाम घातला नाही तर भुमाफियाचे यांचे धाडस वाढेल एवढे नक्की. व काही स्वयंघोषित समाजसेवक सुद्धा या व्यवसायामध्ये बघावयास मिळत असून ज्यांच्या मागे “जी” असे विशेष विशेषण लागल्या जाताना बघावयास मिळत असून अशा दलालांमुळे संपत्तीच्या किमती प्रचंड वाढल्या असून अशा परजीवी संधीसंधान साधू दलाल समाजसेवकापासून सांभाळून राहून व्यवहार करणे योग्य राहील खरेदी विक्री करताना दोन्ही मंडळींनी आपसात पारदर्शक पणे व्यवहार केल्यास दोघांना ते पूरक आणि पोषक असेल.