
प्रतिनिधी प्रवीण जोशी
ढाणकी
ढाणकी पासून जवळच असलेल्या बिटरगाव(बू) येथे दिनांक 20 जानेवारीपासून संगीतमय रामायणाचे आयोजन केले होते आणि त्या संगीतमय रामायणाच्या समारोप व काल्याच्या कीर्तनावेळी भीमाशंकर स्वामी म्हणाले
भजावा जनी पाहता राम ऐकू!
करी बाण एकमुखी शब्द ऐकू!
क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकु!
धरा जानकीनायकाचा विनेकु!
……………
श्रद्धेने अतिशय आदराने परमेश्वराचे पूजन करून नित्यरूपाने भक्ती करणे व सर्वश्रेष्ठ अशा प्रभूची गुणगान करणे व ईश्वरासोबत एकसंघ होणे तेव्हा देवाचे जे काही सदगुण आपल्यात सामावतात किंवा अंगीकारल्या जाते. तसेच ईश्वराचे दर्शन आपल्याला होत असते आणि मग श्रद्धेच्या रूपाने भक्ती केल्यानंतर प्रभुचे, परमेश्वराचे दर्शन घडत असते
याबाबत संत तुकाराम महाराज म्हणतात “जे, जे, भेटे भूत होते माणिजे भगवंत” अशा या वृत्तीमुळे जीवनपटाची प्रेरणा अधिकृत होते. श्री समर्थांना सुद्धा खूप प्रिय वाटणारे प्रभू श्रीराम हे दृढ वचनी वाटतात कारण प्रभू श्रीराम हे दिलेले वचन पाळणारे आहे. म्हणूनच त्यांना एक पत्नी एक वचनी संबोधले जाते. जसे की राजपुत्र असताना देखील प्रभू श्रीराम हे अरण्यातून वनवास भोगून परत आल्यानंतर सुद्धा मर्यादा पुरुषोत्तम झाले. त्यामुळे प्रभू श्रीराम हे दिव्य पुरुष आहेत अशा या स्वयंभू पुरुषाची मनोभावे नामस्मरण करण्यास लाभ होणे म्हणजे मदभाग्याची बाब म्हणावी लागेल. प्रभू रामचंद्र हे शब्द ब्रह्मउपासक, एक वचनी आहे. त्यांनी एकदा वचन दिले तर ते नक्की पाळन हेच मर्यादा पुरुषोत्तमाचे लक्षण होय. विशेष म्हणजे केवळ जगत जननी माता सीता हीच त्यांच्यासाठी सर्वश्रेष्ठ स्वामिनी होती. त्यांच्या या दिव्य गुणामुळे त्यांनी स्वतःचे नाव तर अजरामर केले. व त्यांच्या रघुकुलाचे नाव सुद्धा अजरामर केले जोपर्यंत चंद्र, तारे, पृथ्वी आहे. तोपर्यंत रघुकुलाचे नाव क्षितिजासारखे अमर्याद आहे. या कारणामुळे समर्थ रामदास मनाला म्हणतात की हे मना तुझ्या ठायी, नित्य श्रीराम असू दे हे मना तुझ्याजवळ कायम श्रीरामांचा सुवास दरवळू दे त्यांच्या सदगुणांचा ठाई, ठाई अनंतकाळ दरवळू दे, माझ्या हातून जे काही निरूपणात योग्य ते असल्यास प्रभू रामचंद्रांचे समजावे त्रुटी असल्यास मी माझे कर्म म्हणून स्वीकारतो.असे रामायणाचार्य भीमाशंकर स्वामी म्हणाले “जय जय रघुवीर समर्थ”.
