गुजरी येथे आरोग्य निदान व उपचार शिबिर संपन्न

गुजरी(नागठाना) ता. राळेगाव येथे रविवार दि.11/08/2024 दुपारी 2 ते 6 वाजेपर्यंत श्री.गुरुदेव प्रार्थना मंदिर मध्ये श्री. भाऊरावजी वऱ्हाडे यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रभानजी सिडाम यांच्या शुभहस्ते उद्घाटन श्रीमती.विजया बोबडे सरपंच, प्रकाश बेताल,अखिल धांदे, गंगाधर घोटेकार, मंगेश गोंडे, मधुकर घोटेकार,राजेश झाडे,अशोक सावरकर,गजानन निमरड, पुरुषोत्तम शिरपुरकर, नंदकिशोर निमरड, जिवन खंगण यांचे उपस्थितीत प्रियदर्शनी ग्रामीण विकास संस्था वणी, मंजुषा क्लिनिक राळेगाव व अखिल धांदे मित्र परिवार गुजरी यांच्या वतीने डॉ.सागर कुळसंगे राळेगाव यांनी मार्गदर्शनपर “आरोग्य निदान व उपचार” मोफत शिबिर संपन्न.

शिबिराचे सूत्रसंचालन गंगाधर घोटेकर जीवन प्रचारक अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ यांनी प्रास्ताविक भावनाताई खंगण प्रियदर्शनी ग्रामीण विकास संस्था वणी,आभार प्रदर्शन सरला वावधने राळेगाव यांनी केले. शुगर यशस्वीरितेसाठी अखिल धांदे मित्र परिवार व गु.से. मंडळ गुजरी यांनी विशेष परिश्रम घेतले.