
राळेगांव तालुक्यातील वडकी पोलीस स्टेशन येथे अनेक वर्षांपासून ३३ मोटरसायकल धूळ खात पडून आहेत. तर वडकी ठाणेदार यांनी मोटरसायकल चा शासकीय नियमानुसार लिलाव करण्याचे ठरविले आहे सदर लिलावाची प्रक्रिया शुक्रवार दिनांक ८/१२/२०२३ रोजी सकाळी १० वाजता पोलिस स्टेशन वडकी येथे करण्यात येत असून या लिलावाता तालुक्यातील व वडकी परिसरातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक विजय महाले यांनी केले आहे तसेच इच्छुकांनी उपस्थित रहावे
