
सहसंपादक : रामभाऊ भोयर
भिल बालिका कालीबाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था राळेगाव येथे कोपा या व्यवसायाचे प्रशिक्षक नसल्याने जवळपास दोन महिन्यापासून कोपा व्यवसायाचे प्रशिक्षण नियमितपणे सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांचे व्यवसायिक प्रशिक्षणाचे नुकसान झाले आहे याकरिता येथील विद्यार्थ्यांनी कोपा प्रशिक्षक त्वरित नियुक्त करावे तसेच आवश्यक संगणक व सॉफ्टवेअर व इतर प्रशिक्षण साहित्य तात्काळ उपलब्ध करून द्यावे व थिअरी व प्रॅक्टिकल वर्ग नियमित सुरू करून आजपर्यंत झालेल्या अभ्यासक्रमाची भरपाई करून द्यावी या आशयाचे निवेदन विद्यार्थ्यांच्या वतीने दिं.२३ डिसेंबर २०२५ रोज मंगळवार ला देण्यात आले आहे.
या संस्थेमध्ये कोपा व्यवसायासाठी ४० विद्यार्थ्यांनी प्रवेश केला असून या कोपा व्यवसायाला जवळपास दोन महिन्यापासून पात्र व नियमित प्रशिक्षक (Instructor) उपलब्ध नाहीत. तसेच आवश्यक संगणक, सॉफ्टवेअर, इंटरनेट सुविधा व इतर मूलभूत साहित्याचा अभाव आहे. यामुळे थिअरी व प्रॅक्टिकल वर्ग वेळेवर व नियमितपणे घेण्यात आलेले नाहीत. परिणामी प्रशिक्षणार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक व बौद्धिक नुकसान होत आहे सदर प्रशिक्षण दीर्घ कालावधीपासून न झाल्यामुळे अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होण्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, NCVT/SCVT परीक्षेची तयारी, अप्रेंटिसशिप तसेच भविष्यातील रोजगार संधी यावर प्रतिकूल परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.
या गंभीर संदर्भात संस्थेतील संबंधित अधिकारी व प्राचार्य यांच्याकडे वेळोवेळी तोंडी तसेच लेखी स्वरूपात माहिती देऊनही आजतागायत कोणतीही ठोस व परिणामकारक कार्यवाही झालेली नसून प्रशिक्षणार्थ्यांचे व्यावसायिक नुकसान झाले असून अशा या संबधित जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून योग्य ती प्रशासकीय कार्यवाही करावी अन्यथा वेळीच लक्ष न दिल्यास संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याकडे व मंत्र्यांकडे तक्रार दाखल करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिलेल्या निवेदनातून केला असून निवेदन देतेवेळी प्रथमेश झाडे ज्ञानमय फाटे चिन्मय फाटे मनीषा राऊत अनुराधा पडोळे प्रवेश धनकसार शिवम भोयर शुभम सोनटक्के श्रद्धा धवणे वैष्णवी गहरवाल साक्षी गावंडे वैष्णवी पांपट्टीवार समीक्षा चौधरी मयुरी उभाट आचल झाडे यश देवतळे आदी विद्यार्थ्यांच्या वतीने देण्यात आले आहे.
