
(
सहसंपादक : रामभाऊ भोयर
ग्रामीण भागात शेतीत शेती करणे दिवसेंदिवस कठीण होत चालले होते शेतात जाण्यायेण्याकरिता योग्य रस्ता
नसल्यामुळे अनेक शेतकरी शेती पडीक ठेवत होते अशातच आता शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्याकरिता हक्काचा रस्ता मिळणार आहे मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदण रस्ता योजना अधिक प्रभावी होण्याकरिता क्षत्रिय समिती घटित करण्यात आली आहे याबाबत राळेगाव येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयात समन्वय सभा संपन्न झाली असून या सभेत राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी या योजनेची सविस्तर माहिती दिली….. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्याचा हक्काचा रस्ता नव्हता अनेकांच्या शेतातून पायवाट करून शेतात जावे लागत अशा वेळी आजूबाजूच्या शेतकऱ्यांशी भांडण तंटे होऊन गावात तणावाचे वातावरण असाच अनेक शेतकऱ्यांची पांदण रस्ता मिळण्याची मागणी होती याच पार्श्वभूमीवर १४डिसेंबर २०२५ रोजी रोजी शासनाने आदेश निर्गमित करण्यात आला असून आता शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्याकरिता हक्काचा रस्ता मिळणार आहे या योजनेची संपूर्ण पार्श्वभूमी डॉ अशोक उईके यांनी अधिकाऱ्यांना समजावून सांगितली राळेगाव मतदार संघातील सर्व तालुक्यातील अधिकाऱ्यांची सभा घेऊन क्षत्रिय समिती गठित करण्यात आली आहे या समितीचे अध्यक्ष स्वतः मंत्री अशोक उईके हे असतील तर सदस्य सचिव म्हणून उपविभागीय अधिकारी असतील तर गटविकास अधिकारी तालुका कृषी अधिकारी भूमी अभिलेख अधिकारी वनपरिक्षेत्र अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता पोलीस निरीक्षक हे या समितीचे सदस्य असतील
मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदण रस्ते योजना प्रभावी रित्या राबविल्यानंतर शेतकऱ्यांना पेरणी अंतर मशागत कापणी मळणी शेतमाल बाजारात घेऊन जाणे अशा प्रकारच्या सेवा सुविधा सहज उपलब्ध होणार आहे त्यामुळे ही योजना अधिक प्रभावी राबविण्याकरिता भूमी अभिलेख अधिकारी कार्यालयातून पांदण रस्त्याची पाहणी करून मोफत मोजणी करून सीमांकन केले जाणार काही ठिकाणी अतिक्रमण असतील तर ते पोलीस बंदोबस्तात काढले जातील योजना अधिक प्रभावी राबविण्याकरता ग्रामस्थरावर ग्रामसभेतून शेतकऱ्यांना माहिती दिली जाणार आहे यामुळे पांदण रस्ते अधिक सोयीचे होऊन ते शेतकऱ्यांच्या हिताचे असतील ही योजना अधिक प्रभावी राबविण्याच्या सूचना या प्रसंगी देण्यात आल्या यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲड प्रफुल्ल चौव्हान भाजपा तालुका अध्यक्ष छाया पिंपरे ,उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार अमित भोईटे, गटविकास अधिकारी केशव पवार, पोलीस निरीक्षक शितल मालटे, कळंब, बाभूळगाव येथील तहसिलदार व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते…
