
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील धानोरा येथील सामाजिक कार्यकर्ते व माजी ग्रामपंचायत सदस्य व माजी तंटामुक्ती अध्यक्ष, लोकमत पत्रकार यांचे सेवाग्राम येथे दि. 28 तारखेला पाच वाजता दुख:त निधन झाले. मारोतराव कामडी हे सभावाने शांत, सामाजिक कार्यात अग्रेसर, गोर गरीब जनतेचे कामे करण्यासाठी तत्पर, शिक्षणात उच्च शिक्षित अशी त्यांची राळेगाव तालुक्यात ओळख होती त्याच्या जाण्याने कॉग्रेस पक्षाला मात्र धानोरा येथे नुकसान झाले आहे,
मारोतराव कामडी यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने धानोरा परीसरात हळहळ व्यक्त होत आहे..
