
.
.
सहसंपादक : रामभाऊ भोयर
पुरामुळे होत आहे विद्यार्थ्यांच शैक्षणिक नुकसान..!
अनेक वर्षा पासून करंजी ( सो ) येथील मुख्य रस्त्याच्या नाल्या वरील 3 फूट उंचीच्या पूला ची समस्या अद्यापही कायमच आहे.
प्रत्येक पावसाळ्यात थोड्या प्रमाणात जरी पाऊस आला तरी नाल्या वरुन पाणी वाहायला सुर्वात होते अश्या परिस्थितीत शाळकरी विद्यार्थी,शेतकरी,शेतमजूर,गावातील जि. प.शिक्षक कधी या बाजूने तरी कधी त्या बाजून अटकुन पडतात व पाणी कमी होण्याची तासन तास वाट बघतात.
सदर समस्येची वरंवार तक्रार करून निवेदन देऊन सुद्धा प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
या वर्षी समस्येचा तोडगा न निघाल्यास गावकरी व विद्यार्थ्यानसह उपोषणाला बसण्याचा इशारा करंजी ( सो ) येथील सरपंच प्रसाद ठाकरे यांनी दिला आहे.
