
सहसंपादक : रामभाऊ भोयर
न्यू इंग्लिश हायस्कूल येथे दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने न्यू एज्युकेशन सोसायटी च्या सचिव डॉ. अर्चनाताई धर्मे यांच्या मार्गदर्शनात शाळेचे मुख्याध्यापक विजय कचरे यांच्या संकल्पनेतून शाळेतील सर्व महिला शिक्षिकांचा सत्कार आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा मनीषा इखे तर मुख्य अतिथी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक विजय कचरे, पर्यवेक्षक सूचित बेहरे, शिफ्ट इन्चार्ज अरुण कामनापुरे यांच्यासह शाळेतील सर्व महिला शिक्षिका व्यासपीठावर यावेळी उपस्थित होत्या.यावेळी शाळेतील सर्व महिला शिक्षिकांसह, शाळेत वर्षभर विद्यार्थ्यांकरिता शालेय पोषण आहार बनविणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ व भेट वस्तू देऊन शाळेत सत्कार करण्यात आला.. जागतिक महिला दिना निमित्त सर्व सत्कारमूर्ती शिक्षिकांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे बहारदार संचालन सुरज आफुणे यांनी तर आभार प्रदर्शन विनोद चिरडे यांनी केले. जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे यशस्वीते करिता शाळेतील सर्व शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी यांनी सहकार्य केले..
