
प्रतिनिधी: यवतमाळ
प्रविण जोशी
जिल्ह्यासह तालुक्यातील व परीसरातील शेतकऱ्यांचे मनोबल वाढावे शेतकर्यांना आपल्या बैलांन सोबत प्रेमाची भावना निर्मान व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनमोहन भोयर व मित्र परिवारच्या वतीने बाभुळगाव येथील बसस्थानका जवळ अभय गुगलीया यांच्या शेतात दिनांक 8,9,10,मार्च रोजी भव्य शंकर पटाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये तीन गट असून ‘अ ‘ गट, ‘ ब ‘ गट व तालुका गट अश्या पद्धतीने विभागणी करून शंकर पटाचे आयोजन करण्यात आले आहे प्रत्येक गटामध्ये भरघोस बक्षीस ठेवण्यात आली आहे
या भव्य शंकर पटाचे उद्घाटन 8 मार्च रोजी माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री माणिकराव ठाकरे हे राहणार आहे तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार रणजित कांबळे, काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे,माजी आमदार विरेंद्र जगताप, प्रफुल्ल मानकर, वसंतराव घुइखेडकर,विठ्ठल कुमरे, सुरेश चिंचोडकर ,मनीष पाटील,भैय्यासाहेब देशमुख, भीमसिंगबाबु सोळंके, नरेंद्र कोंबे,कृष्णा कडू, अतुल राऊत, रमेश लोखंडे,अभय गुगलीया,वासुदेव शिंदे, बाळासाहेब मांगूळकर, प्रविण देशमुख, देवानंद पवार, अरविंद वाढोणकर ,अशोकराव घारफळकर ,प्रविण देशमुख, श्रीकांत कापसे,मोहन बनकर, अतुल देशमुख,रमेश महानूर,शाम जगताप, शैलेश गुल्हाने आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी जिल्ह्य़ातील शेतकर्यांनी आपल्या सर्जा,राज्याला व छकड्याला घेऊन यावे व आपली शंकरपटासाठी नोदणी करुन घ्यावी. बळीराज्याने शंकरपाटात छकडा धाऊन सेकंदांच्या शंकरपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे
