
सहसंपादक : रामभाऊ भोयर
खडका येथील प्रकल्प स्थळी हजारोच्या संख्येने काम बंद करण्याकरीता पुरुष व महिला उपस्थित होत्या.
निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीने दिनांक 24 नोव्हेंबर सोमवार रोजी प्रकल्याचे सुरू असलेले काम बंद करण्याबाबत रीतसर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, कार्यकारी अभियंता, पोलीस स्टेशन पारवा, पोलीस स्टेशन मांडवी यांना लिखित निवेदन देऊन काम बंद करण्याची विनंती केली , पाटबंधारे विभागाने काम बंद न केल्यामुळे दिनांक 29 नोव्हेंबर शनिवार ला निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या प्रकल्प स्थळी धरण विरोधी संघर्ष समितीचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने काम बंद आंदोलन करण्यासाठी स्वयंस्फूरतीने गोळा झाले असता अशाही परिस्थितीत धरणाचे काम सुरूच असल्यामुळे प्रकल्पग्रस्त संतप्त झाले आणि त्यांनी कामावर असलेल्या जेसीबी व टिप्परच्या काचा फोडल्या व त्या वाहनांवर तुफान दगडफेक केली.
दि. 28 नोव्हेंबर ला मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यवतमाळ येथे आले असता धरण विरोधी समितीच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली असता त्यांनी मी आर्णी व किनवट विधानसभा प्रचारा दरम्यान प्रकल्पाबाबत जे आश्वासन दिले होते त्यावर मी कायम असल्याचे धरण विरोधी समिती ला सांगितले.
शनिवारी पोलीस बंदोबस्तात कार्यकारी अभियंता सुरज राठोड,अनिकेत गुल्हाने, टेमरे इत्यादी सोबत चर्चा झाली त्यांनी काम बंद करण्याचे आश्वासन दिले परंतु कायमस्वरूपी काम बंद करण्याचे आश्वासन आम्ही लेखी स्वरुपात देऊ शकत नाही असे सांगितल्याने उपस्थित प्रकल्पग्रस्त ज्या ठिकाणी काम चालू होते तेथे महिला व पुरुष गेले काही पुरुषांनी नंबर नसलेल्या टिप्परचे काचा फोडल्या व उभ्या वाहनांवर तुफान दगडफेक केली
त्यानंतर जोपर्यत प्रकल्प स्थळावरून उभ्या असलेल्या जेसीबी व टिप्पर हलविण्यात येणार नाही तोपर्यंत आम्ही येथेच ठिय्या मांडू असा आक्रमक पवित्रा धरण विरोधी लोकांनी घेतल्यामुळे पोलीसांनी कामावरील सर्व वाहने पोलिस बंदोबस्तात प्रकल्प स्थळावरून हलविल्यानंतर आंदोलक आप आपल्या गावाकडे परतले.
आजच्या आंदोलनात विदर्भ मराठवाडयातील चार ते पाच हजार महिला पुरुष मंडळी गोळा झाले होते.
आजच्या आंदोलनात धरण विरोधी संघर्ष समितीचे प्रल्हादराव पाटील जगताप, मुबारक तंवर, बंडुसिंग नाईक, विजय पाटील राऊत, प्रल्हादराव गावंडे सर, बंटी पाटील जोमदे, जयराम मिश्रा, गजानन डाखोरे , डॉ .बाबा डाखोरे,गुलाब मेश्राम,विजय पाझारे, शंकर सिडाम यासह हजारो शेतकरी व धरण विरोधक उपस्थित होते
