
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी येथे यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती शाखा गेल्या अनेक दशकापासून कार्यरत असताना ग्राहकांचा आजही विश्वास कायम आहे. पण या ठिकाणी ग्राहकांना रक्कम काढायला गेले असता आठवड्यातील कामकाज असलेल्या दिवशी विड्रॉल केल्यानंतर वेळेवर कधीही रक्कम मिळत नाही त्यामुळे ग्राहक हैराण असतात. अनेक मध्यमवर्गीयांपासून ते व्यापाऱ्यांची सुद्धा बचत खाते आहे. ही शेतकऱ्यांची बँक म्हणून प्रसिद्ध असलेल्या बँकेला शेतकऱ्यांनी वाढवले मोठे केले या बँकेला ग्राहकांची मात्र परवा दिसत नाही.
अनेक शेतकरी हमीभाव केंद्रावर माल विकायला गेल्यानंतर आपली हक्काची बँक म्हणून येथील खाता क्रमांक देऊन या ठिकाणी आपली रक्कम जमा करतो. पण ज्या शेतकऱ्यांची व ग्राहकाची रक्कम त्याला वेळवर मिळत नाही शिवाय आज काही आणि उदया काही रक्कम घेऊन जा असं सांगण्यात येते. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी वर्ग असलेल्या या बँकेला या व्यवस्थेमुळे हैराण झालेले असताना यांची प्रशासकीय यंत्रणा काय करते हा प्रश्न ग्राहकांसमोर उभा टाकतो.
“मोले घातले रडाया नाही असू नाही माया” शब्द रचना तंतोतंत इथे लागू पडते.
एखाद्या ग्राहकाला जास्त रक्कम पाहिजे असल्यास विड्रॉल करणाऱ्या व्यक्तीला जर दवाखान्यातील कामकाजासाठी रक्कम पाहिजे असल्यास ते कधीही वेळेवर मिळणार नाही ग्राहकाची रक्कम असून ती त्याला मिळवण्यासाठी अगदी विनंती करावी लागते यापेक्षा दुर्दैव या ठिकाणी कोणते असायला पाहिजे. एकीकडे बँक सांगत असते आमच्या ९५ शाखा आहेत पण असणाऱ्या शाखेत ग्राहक ठेवीदार शत प्रतीशत समाधानी आहे??
