
सहसंपादक : रामभाऊ भोयर
कळंब :-डोंगरखर्डा जोडमोहा जिल्हा परिषद गट मधील जनतेची सेवा करण्यासाठीशिवसेना (शिंदे )कडून दिलीप माणिकराव मसराम सेवानिवृत्त (PSI) रा.पहूर (इजारा).उमेदवार इच्छुकआहे.त्याचं थोडक्यात.
शून्यातून दिवस काढलेत पण त्या शून्याला कधी विसरलो नाही आणि विसरणार नाही.आजही मागील शून्य पाहत पुढे मार्गक्रमण करतो.
माझा जन्म गोंड समाजात झाला. लहानपणापासूनच अतिशय गरीबीत एका गवताच्या घरात जीवन काढले.लहान असताना दोन रुपयाच्या शेतमजुरी पासून ते मोठे झाल्यावर खनती,माती,गोट्याचे काम केले. प्रथम मौजा पहुर येथे प्राथमिक शिक्षण घेतले नंतर घाटंजी येथे वर्ग पाचवी ते सातवी पर्यंत मराठी माध्यम व वर्ग 8 ते 10 पर्यंत इंग्रजी माध्यम मध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर गिलानी कॉलेजमध्ये BA पर्यंतचे शिक्षण घेत असताना यवतमाळ येथे पोलीस डिपार्टमेंट मध्ये भरती दिली व 20 फेब्रुवारी 1989 नोकरी जॉईन केली. परंतु शिक्षण घेत असताना फौजदार होण्याचे स्वप्न पहात असल्याने पोलीस कॉन्स्टेबल या पदावर समाधानी न राहता फौजदार होण्याकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी नोकरी असताना सुरू ठेवली अभ्यास करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 1992,1998,2003, 2009 अशा सलग चार वेळा परीक्षा उत्तीर्ण केल्या आणि शारीरिक व मौखिक सुद्धा उत्तीर्ण केल्यात परंतु सिलेक्शन यादीमध्ये केवळ पाच ते दहा मार्क प्रत्येक वेळी कमी पडल्याने सिलेक्शन यादीमध्ये माझे नाव आले नाहीत हे माझे दुर्भाग्य समजतो. शेवटी 2013 च्या डिपार्टमेंटल फौजदार परीक्षेमध्ये यश येऊन 2015 मध्ये पोलीस उपनिरीक्षक(PSI)या पदावर पदोन्नती मिळाली यामध्ये आम्हाला समाधान मानावे लागले.आम्ही पोलीस खात्यामध्ये असताना पोलीस स्टेशन वणी, वडकी,स्थानिक गुन्हे शाखा (LCB) यवतमाळ, पांढरकवडा,उमरखेड, पोलीस मुख्यालय, यवतमाळ शहर इत्यादी ठिकाणी पोलीस कर्मचारी म्हणून यशस्वीरित्या सेवा केलेली आहे आणि PSI म्हणून पोलीस स्टेशन आर्णी, डायल 112 शाखा यवतमाळ तसेच लकडगंज पोलीस स्टेशन नागपूर येथे सुद्धा सेवा केली आहे.
सन 1989 ते 2023 सेवानिवृत होईपर्यंत 34 वर्षे 8 महिने पोलीस खात्यामध्ये निष्कलंक सेवा करून यशस्वीरित्या निवृत्त झालो. पोलीस खात्यामध्ये नोकरी करीत असताना आम्ही कोणावरही अन्याय केलेला नाही आम्ही पोलीस खात्याच्या सदरक्षणाय खलनिग्रहनाय आहे उक्ती याप्रमाणे सेवा केलेली आहे. आम्ही आमच्या आयुष्यामध्ये कधीही दारू किंवा सिगारेटची चव सुद्धा घेतलेली नाही आणि घेणार पण नाही.
माझ्या मते “Edgucation is the third eye of Man” म्हणजे शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे आणि हा तिसरा डोळा प्रत्येकाने मिळवावा म्हणजे प्रत्येकाने खूप शिकावे आपल्या मुला मुलींना खूप शिकवावे कारण या स्पर्धेच्या युगात “शिकेल तोच टिकेल” असे मला वाटते.
तरुणांना मला सांगावेसे वाटते की त्यांनी दारूच्या व्यसनापासून दूर राहावे हे माझ्यासाठी नाही तर तुमच्या कुटुंबासाठी फार महत्त्वाचे आहेत. आपला भारत देश हा वेगवेगळ्या जातीपंथाचा,धर्माचा आहे प्रत्येकाने आपल्या धर्माचे आचरण करावे पण इतर धर्मावर,जातीवर टीका करू नये. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे असे आम्हाला वाटते.
प्रत्येकाने आपल्या कुटुंबाचा गाडा चालविण्याकरिता कष्ट,कष्ट आणि कष्टच करावे एक दिवस यश तुम्हाला नक्की मिळेल.तसेच विद्यार्थ्यांनी अभ्यास,अभ्यास आणि अभ्यासच करावा यश नक्की मिळेल.
*जब तक ना सफल हो, नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोडके ना भागो तुम, कुछ किये बिना ही जय जय कार नही होती, कोशिश करने वालो की कभी हार नही होती.
माझे तत्व:- साधी राहणी उच्च विचारसरणी.
Simple living high thinking.
