
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशान्वये अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत राळेगाव पोलीसांनी आज मोठी कारवाई केली. राळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोपालनगर आणि बोराटी शिवारात वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून पोलिसांनी तब्बल १ लाख ४ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणी ५ आरोपींविरुद्ध ५ वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ३ जून रोजी सकाळी राळेगाव पोलीस पथकाने ही धडक कारवाई केली.आरोपी शाहीर आसराम फुळमाळी (वय ४७): यांच्या घरातून ६०० लिटर मोहमाच (किंमत ३०,००० रुपये) आणि २० लिटर गावठी दारू (किंमत २,००० रुपये) असा एकूण ३२,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, आरोपी ज्ञानेश्वर चीनाऊ फुळमाळी (वय ४७): याच्या घरातून दारू गाळण्यासाठी लागणारा १०० लिटर सळवा मोहमाच, किंमत ५,००० रुपये जप्त करण्यात आला, आरोपी किसन महेबुब काळे (वय ३२): याच्या घरातून १५ लिटर गावठी दारू, किंमत १,५०० रुपये जप्त करण्यात आली, कलींदा बब्बु काळे (वय ४०): या महिला आरोपीच्या घरातून दोन बकेटमधील १०० लिटर मोहमाच सळवा (किंमत १०,००० रुपये) आणि २० लिटर गावठी दारू (किंमत २,००० रुपये) असा एकूण १२,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. उमेश मंगल पवार (वय ३६, रा. बोराटी): हा आरोपी नाल्याच्या काठी अवैध गावठी दारू गाळताना रंगेहात मिळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून १०३० लिटर सळवा मोहमाच (किंमत ३६,०५० रुपये), १०० लिटर तयार गावठी दारू (किंमत १०,००० रुपये) आणि दारू तयार करण्याचे ७,९०० रुपयांचे साहित्य, असा एकूण ५३,९५० रुपयांचा मोठा मुद्देमाल जप्त केला.
