अखंड हरिनाम सप्ताह निमित्त ढाणकी शहरात पालखीची शोभायात्रा भक्तांचा ओसंडला जनसागर


प्रतिनिधी::
प्रविण जोशी


इंदिरा गांधी चौक आखर ढाणकी येथे दिनांक २२ जानेवारी पासून अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. त्या निमित्ताने २८ जानेवारी रोजी संपूर्ण शहराला मुख्य मार्ग असलेल्या ठिकाणावरून पालखीची शोभायात्रा काढण्यात आली होती. यावेळी रस्ता स्वच्छ करून ठिकठिकाणी नेत्र दीपक अशा सुंदर रांगोळ्या सुद्धा काढल्या गेल्या होत्या. यावेळी हा सोहळा बघण्यासाठी आजूबाजूच्या खेडेगावातून मोठ्या प्रमाणात शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी भक्तांचा जनसागर ओसंडला होता. बालगोपाल पारंपारिक वेशभूषेसह हातात टाळ घेऊन मृदुंगाच्या तालावर “हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा” हा जप -मंत्र म्हणण्यात तल्लीन झालेली बघायला मिळाली. पुरुष भक्त मंडळीच्या डोक्यावर वारकरी सांप्रदायाची शिकवण असलेला पैहराव धोतर व टोपी हे आवर्जून बघायला मिळाले आणि ते शांततेचेच प्रतीक असून तो संदेश गेल्या अनेक काळापासून वारकरी संप्रदाय देत आहे. जी पालखी होती ,ती हारांनी व फुलांनी सजवल्यानंतर त्यात पवित्र ग्रंथ व ज्ञानेश्वर माऊली ची प्रतिमा ठेवून ही पालखी मुख्य मार्गावरून जाताना प्रत्येक चौकात मोठ्या भक्ती भावाने पूजन करण्यात आले. यावेळी भक्त राजांच्या मस्तकी पारायण करत असलेल्या ग्रंथ होता शिवाय तुळशी मातीचे वृंदावन सुद्धा होते. पालखी शोभायात्रा निघाल्यानंतर कोणत्याही भक्तांच्या पायात पादत्राने दिसल्या नाही हे विशेष बाब म्हणावी लागेल. संपूर्ण मानव जातीच्या उद्धारासाठी माऊलीने छोटेसे भक्तीचे स्वरूप लावले व राम कृष्ण हरी या नाम जपाचा मंत्र भक्तांनी आदराने स्वीकारला . लावलेल्या छोट्याशा भक्तीचा वेल हा अक्षय असून क्षितिजापेक्षा अधिक स्वरूपात वसलेला आहे.ईश स्वरूप त्रिकाल सत्यब्रह्म असून अगदी शेवटच्या क्षणापर्यंत वृद्धींगत होत जातो.