
(अंशकालीन अर्धवेळ आरोग्य स्त्री परिचरांना तीन हजारांची भरगोस वाढ; शासनाचा मोठा निर्णय. )
सहसंपादक : रामभाऊ भोयर
वाय आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अंशकालीन स्त्री परिचर कृती समितीच्या लढ्यालाला मोठे यश आले आहे. महाराष्ट्रभरातील अंशकालीन अर्धवेळ आरोग्य स्त्री परिचय यांच्या पगारांमध्ये महाराष्ट्र शासनाने मुंबई येथे दिनांक 17 मार्च 2026 रोजी दरमहा तीन हजारांची भरघोस मानधन वाढ करण्यात आली आहे. आता या पुढे दरमहा सहा हजार रुपये मिळतील.सदर मानधन वाढ दि. 1 एप्रिल 2026 पासून लागू होईल व दरमहा 10 तारखेच्या आत खात्यावर मोबदला जमा करण्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे राज्यातील पंधरा हजार व यवतमाळ जिल्ह्यातील जवळजवळ 450 अंशकालीन स्त्री -परिचर महिलांना याचा प्रत्यक्ष फायदा होईल. अशी माहिती आयटकचे राज्याचे नेते कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे, कॉ.नामदेव चव्हाण व अर्धवेळ आरोग्य स्त्री परिचर कृती समितीचे नेते कॉम्रेड दिवाकर नागपुरे यांनी दिली आहे.
आयटक संघटनेच्या राज्य कृती समितीच्या वतीने; गेली सात ते आठ वर्ष सातत्याने नागपूर हिवाळी विधीमंडळ अधिवेशन, मुंबई अर्थसंकल्प विधीमंडळ अधिवेशनावर मोर्चे, धरणे आंदोलने केली गेली होती. त्याचप्रमाणे राज्यात ठीक ठिकाणी जिल्हास्तरीय जेलभरो , मोर्चे , धरणे आंदोलने करून पगारवाढीच्या प्रश्नाकडे सातत्याने आयटक या संघटनेने लक्ष वेधले होते. त्याचप्रमाणे राज्यातील आमदारांना निवेदने देखील दिली गेली होती. या संपूर्ण संघर्षाला मोठे यश प्राप्त झाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
अंशकालीन अर्धवेळ आरोग्य स्त्री परिचर या सुरवातीला पन्नास रुपये दरमहा पासून काम करत आल्या आहेत.गेली 30 ते 35 वर्ष अल्प मोबदल्यावर त्या काम करत आहेत. येणाऱ्या काळात त्यांना शासन कर्मचारी दर्जा मिळावा. किमान वेतन मिळावे, रजा, ग्रॅज्युएजी, पेन्शन , वाढीव बोनस, कोरोना काळातील प्रोत्साहन भत्ता मिळावा यासाठी लढा सुरूच राहणार आहे. राज्याचे सन्माननीय आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर साहेब राज्य शासन व अंशकालीन स्त्री परिचर आंदोलनाची दखल घेऊन निर्णय घेतला या बद्दल आयटक व कृती समिती वतीने राज्य संघटनेकडून त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद व्यक्त करण्यात आले आहेत. राज्याचे नेते कॉम्रेड कॉम्रेड नामदेव चव्हाण , कॉम्रेड राजू देसले, कॉम्रेड शाम काळे , कॉम्रेड निलेश दातखिळे, कॉम्रेड ॲड.बळवंत पवार, कॉम्रेड दिलीप उटाणे कॉम्रेड हमिदा शेख, कॉम्रेड इंदुमती केवट, कॉम्रेड प्रवीण मस्तुद, कॉम्रेड शिवाजी फुलवाले, कॉम्रेड दिवाकर नागपूरे , कॉम्रेड चित्रा जगताप, कॉम्रेड देविदास बोन्द्रडे, कॉम्रेड शालूबाई कुथे, कॉम्रेड अब्दुल गफार, कॉम्रेड रत्नप्रभा गायकवाड, कॉम्रेड सुचिता गायकवाड, कॉम्रेड मुगाजी बुरुड, कॉम्रेड देविदास जिंगे आदींनी मोठा संघर्ष प्रयत्न केला आहे.
कॉम्रेड दिवाकर नागपुरे, जिल्हा सचिव, आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अंशकालीन स्त्री -परिचर संघटना यवतमाळ जिल्हा. 9970388586
