
.
वणी तालुक्यातील येथील मुकुटबन मार्गावरील असलेले व्यापाऱ्यांचे प्रतिष्ठाण फोडून चोरट्यानी ७० हजार रुपये लंपास केले आहे. ही घटना आज ता. ०३ रोजी पहाटे ३.३० वाजता घडली असून याबाबत पोलीसात तक्रार नोंद केली आहे मागील सहा महिन्यांपासून वणी शहरात चोरट्यांनी घरफोडयांची मालिका सुरू केली असून यातील बहुतांश घटना आज पर्यंत उघडकीय आलेल्या नाही त्यामुळे पोलिसांचा वचक कुठ तरी कमी पडत असल्याचे निदर्शनास येत आहे. मागील ८ दिवसांपूर्वी शहरातील मध्यभागी असलेले कापड दुकान फोडून चोरटयानी लाखो रुपये लंपास करून दुकानाला आग लावून दिली होती या घटनेची राख थंडी होत नाही तोच चोरट्यांनी पोलिसांच्या नाकावर लिंबू पिळून आज पहाटे ३.३० वा. च्या सुमारास तोंडाला कापड बांधून मुकुटबन मार्गावरील सुरेश खिवंसरा यांचे जैन बिल्डिंग सोल्युशन नामक दुकान मागच्या बाजूने लावलेले तीन टॉमी च्या साहाय्याने वाकवून चोरांनी आत प्रवेश घेतला व त्यांचे दुकानातील गल्यातून ७० हजार रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडल्याने पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थे संदर्भात प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. सदर घटना हि सिसिटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असली तरी चोरांच्या तोंडाला कापड बांधून असल्याने चोरांची ओळख पटविणे अवघड असले तरी पोलिसांसमोर गुन्हा उघडकीस आणायला आवाहनच निर्माण झाले आहे.
सातत्याने वाढत असलेल्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून घातलेल्या गुन्ह्याचा तपास करण्याकरिता पोलीस प्रशासन पूर्णतः अपयशी ठरत असल्याने वरिष्ठांनी वणीकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.
