
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव मतदार संघातील महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार प्रा वसंत पुरके यांनी राळेगाव येथे पत्रकार परिषद घेऊन विजयी उमेदवार प्राचार्य डॉ अशोक उईके यांना शुभेच्छा दिल्या असून त्यांनी मतदारसंघासाठी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी तसेच आपल्याला यांनी मतदान केले नाही तो काँग्रेसचा आहे तो अमुक पक्षाचा आहे तो अमुक गटाचा आहे तुला बघून घेईल असा पक्षभेद मतभेद न पाळता मतदारसंघातील विकास कामे करावी असे मत व्यक्त केले… महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांनी कार्यकर्त्यांनी पक्षातील नेत्यांनी आपल्यासाठी जी मेहनत घेतली त्यामुळेच आपण इतक्या कमी फरकाने पराभूत झालो त्यामुळे आपला कोणावर आकस नाही…. राज्यात महाविकास आघाडीचे उमेदवार कमी निवडून आले काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली तरी ही हानी भरून काढण्याकरता मी पक्षाचा सच्चा शिपाई म्हणून कार्य करीत राहील
……….. महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा असून या विचारसरणीला काँग्रेसच्या विचारसरणीला भविष्यात बळकटी देण्याकरिता तसेच राळेगाव मतदारसंघात काँग्रेसला मजबूत करण्याकरिता विविध स्तरावर विविध संघटनात्मक बांधणी करून पक्ष मजबूत केला जाईल…………… काँग्रेस पक्षाने आपल्यावर विश्वास ठेवून सतत चार वेळा या मतदारसंघातील मतदारांनी माझ्यावर भरभरून प्रेम केले सतत तीन वेळा पराभव जरी झाला असला तरी हा पराभव अतिशय कमी मताने झाला असून या पराभवाकडे मी सकारात्मक दृष्टीने बघून मतदारसंघातील जनतेची सेवा करीत राहील माझ्या परीने जेवढे काम जनतेचे करता येईल तेवढे मी निश्चितपणे करील कारण शेवटी माझा मतदार यांना माझं दैवत समजतो ……. ईव्हीएम हटाव या मोहिमेत महाविकास आघाडीच्या आंदोलनात आपण सक्रियपणे सहभागी असून ईव्हीएम हटाव या मोहिमेत पक्षाची जी भूमिका असेल त्या भूमिकेला पुढे नेण्याकरता मी ठामपणे प्रयत्न करणार आहे….. पत्रकार परिषदेत ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष अरविंद वाढोणकर काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेंद्र तेलंगे शहराध्यक्ष प्रदीप पुणे नगराध्यक्ष रवींद्र शेराम उपनगराध्यक्ष जानराव गिरी. भानुदास राऊत यांची उपस्थिती होती
