
(मुंख्यमंत्री साहेब , दरमहा देत असलेल्या अडीच हजार रूपयात जगता येत नाही मानधन वाढ करा – )
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनच्या राज्य कमेटीने स्वयंपाकी मदतनीस यांचे मानधन वाढीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली त्यानुसार यवतमाळ जिल्हा शाखेच्या वतीने आज दिनांक २९-०५-२०२६ रोजी स्वयंपाकी मदतनीस यांचे मानधनात रू.१०००/- राज्य सरकारने वाढ करावी व त्याचा शासन निर्णय काढण्यात यावा शासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने आंदोलन करण्यात आली. तसेच मा. ना. देवेंद्रजी फडणवीस, मुंख्खमंत्री, महाराष्ट्र राज्य मुंबई यांना मा. जिल्हाधिकारी साहेब, यवतमाळ यांचे मार्फत मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले आहे .
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनिस महाराष्ट्रातील शापोआ पात्र शाळांत दुपारचे भोजन म्हणुन मुलांना शाळांत खिचडी बनवुन देत आहेत. शासन त्यांना या कामाचा मोबदला महिन्यासाठी दरमहा २५०० रुपये इतके अत्यल्प मानधन सद्या देत आहे. तेही १० महीनेच देत आहे, स्वंयपाकी तथा मदतनीस यांच्या मानधनात दरमहा सन्मान जनक वाढ करावी म्हणुन प्रत्येक अधिवेशनावर मोर्चे, धरणे, साखळी उपोषण, महा मुक्कामी मोर्चा या प्रकारच्या सनदशीर मार्गाने आंदोलन करुन शासनाचे सतत लक्ष वेधण्यात येत आहे. तथापी सध्याच्या सरकारमधील उपमुख्यमंत्री असलेले व अगोदर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणुन असलेले मा. ना. एकनाथजी शिंदे यांच्या मंत्रीमंडळाने वरिल संदर्भ क्र.०१ अन्वये स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या मानधनात दरमहा रू.१०००/- वाढीचा निर्णय घेतलेला आहे. तसेच ०१ एप्रिल २०२४ पासुन या निर्णयाची अमंलबजावणी करण्यात येईल असे आश्वासन सुध्दा त्यांनी दिलेले आहे.
मा. एकनाथराव शिंदे यांच्या मंत्रीमंडळाने जाहिर केलेल्या निर्णयाप्रमाणे वरील संदर्भ क्रं. ०२ नुसार शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांनी दि. २३/०१/२०२५ ला मान्यतेसाठी प्रस्ताव अर्थ विभाग (व्यय- ५) यांच्याकडे सादर केलेला आहे. तसेच राज्य शासनाने या संदर्भात दखल न घेतल्याने दि. १०/१२/२०२५ रोजी नागपुर येथील हिवाळी अधिवेशनावर स्वंयपाकी तथा मदतनिस यांचा महामुक्कामी मोर्चा काढण्यात आलेला होता. यावेळेस मा.ना. दादाजी भुसे शिक्षण मंत्री, व मा. मुख्यमंत्री महोदय यांनी शिष्ठमंडळास दुरध्वनी व्दारे संवाद साधुन एक महिन्यात निर्णय घेऊ असे शिष्ठमंडळास आश्वासन दिले होते.परंतू आजवर रू.१०००/- मानधन वाढीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला नाही शासनाने आश्वासनाची पूर्तता केलेली नाही राज्य सरकारने राज्यातील स्वंयपाकी तथा मदतनिस यांच्याकडे दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे शासनाप्रती राज्यातील स्वंयपाकी महिला कामगारांच्या मनात असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे.
सरकारने आंदोलनाची दखल घेऊन स्वंयपाकी तथा मदतनिस यांच्या १०००/- रु. मानधन वाढीबाबत ताबडतोब शासन निर्णय जाहीर करुन त्यांची अमंलबजावणी ताबडतोब करावी उपेक्षित घटकांना न्याय द्यावा अन्यथा मा. मुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य यांच्या नागपुर येथील सरकारी निवासस्थानी स्वंयपाकी तथा मतदनिस यांचा महामोर्चा काढुन मुख्यमंत्री निवासाला घेराव घालणार आहे. यांची संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील यांची नोंद घ्यावी असा इशारा आयटक च्या वतीने निवेदनाद्वारे दिला आहे यावेळी कॉ. दिवाकर नागपुरे ,राज्य सहसचिव तथा जिल्हाध्यक्ष, कॉ.विलास ससाने,जिल्हा सचिव,कॉ. शंकरराव कदम, सुखदेव धुर्वे, गोपाल घोडाम, अजाब मेश्राम,लियाकत बी शेख ,सुरेखा कुंभरे, तुळसा मेशेकर, शकुंतला कासार, विद्या कोल्हे,लता सवाईमुल, मेहरबानो शेख, फातेमा शेख, या सह इतरही अनेक उपस्थित होते
