
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
सध्या सर्वत्र उन्हाचा पारा 45 अंशाच्या वर पोहोचला असून मागील आठवडाभऱ्यापासून तापमान स्थिर आहे. अशा कडक उन्हात प्रशासकीय कार्यालयात कुलर ला पाणी मिळत आहे तर कार्यालयातील अधिकाऱ्यांना जारचे पाणी मिळत आहे परंतु बाहेर गावावरून येणाऱ्या नागरिकांना बाहेर जाऊन विकतचे पाणी प्यावे लागत असून लाखो रुपयांच्या प्रशासकीय इमारतीत पिण्याच्या पाण्याचे ऑरो असून बंद अवस्थेत असल्याने कार्यालयात येणाऱ्या नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली आहे.
प्रशासनाने या लाखो रुपयांच्या प्रशासकीय इमारतीत येणाऱ्या नागरिकांसाठी थंड पिण्याच्या पाण्यासाठी ऑरो उपलब्ध करून दिले परंतु मागील वर्षापासून या प्रशासकीय इमारतीमधील थंड पिण्याचे ऑरो बंद असल्याने व पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नसल्याने बाहेर गावावरून येणाऱ्या नागरिकांना भर उन्हात बाहेर जाऊन विकतचे पाणी प्यावे लागत आहे मात्र याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष दिसून येत आहे त्यामुळे प्रशासकीय इमारतीमध्ये असलेले थंड पाण्याचे ऑरो चालू करण्यात यावे अशी मागणी येथे येणाऱ्या नागरिकाकडून केली जात आहे.
तालुक्यामध्ये शंभर च्यावर गावांचा समावेश आहे. कित्येक लोक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी या प्रशासकीय कार्यालयात ,पंचायत समिती भूमिअभिलेख, तालुका प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलीस स्टेशन बाल विकास प्रकल्प कार्यालय आदी कार्यालयात शेकडो नागरिक आपल्या कार्यालयीन काम करीता येत असतात परंतु या कार्यालयात पिण्याच्या पाण्याचे व्यवस्था नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत असून नागरिकाना हॉटेल किंवा पान टपरीवर विकतचे पाणी प्यावे लागत आहे मात्र याकडे कोणतेही अधिकारी गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे. मे महिना संपत आला असून जिल्ह्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. उन्हाने जीवाची लाही लाही होत असताना मात्र शंभर किलोमीटर वरून येणारे नागरिक पहिले कार्यालयात आल्यानंतर पिण्याच्या पाण्याचा शोध घेत असतात परंतु कार्यालयात पिण्याचे पाणी नसल्याने अखेर नागरिकांना कार्यालयाच्या बाहेर जाऊन विकतचे पाणी प्यावे लागत आहे.
तालुक्यात तहसील कार्यालयाची भव्यदिव्य प्रशासकीय इमारत असून या इमारतीत कृषी विभाग पुरवठा विभाग निवडणूक विभाग संजय गांधी विभाग जमाबंदी विभाग दुय्यम निबंधक आदी कार्यालय आहे.या कार्यालयात सुरुवातीला नव्याने थंड पाण्याचे ऑरो बसविण्यात आले होते. तेव्हा नागरिकांना थंड पाणी मिळत होते परंतु मागील वर्षापासून हे ऑरो बंद पडले असून याकडे संबंधित अधिकाऱ्याचे दुर्लक्ष असल्याने ऑरो बंद अवस्थेत दिसून येत आहे. त्याच प्रमाणे नव्याने तालुका प्राथमिक आरोग्य केंद्राची लाखो रुपयांची इमारत बांधकाम करण्यात आली मात्र या कार्यालयात पिण्याचे पाण्याची सोय नसल्याची ओरड नागरिकांकडून केली जात आहे.तसेच पंचायत समिती कार्यालयात मागील दोन तीन महिन्यांपूर्वी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत शुद्ध व थंड पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली. परंतु या ऑरो प्लांटला पुरेसे पाणी नसल्यामुळे येथेही थंड पाणी मिळत नाही त्यामुळे तालुक्यातील येणाऱ्या शासकीय कार्यालयातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी नाहक भटकावे लागत आहे. मात्र याबाबत संबंधित अधिकारी कुठलीही भूमिका घेताना दिसून येत नाही त्यामुळे नागरिकांनी या संबंधित अधिकाऱ्यांवर आपला रोष व्यक्त केला जात आहे.
तरी वरिष्ठ अधिकाऱ्याने किंवा लोकप्रतिनिधीने याकडे वेळीच लक्ष घालून शासकीय कार्यालयातील पिण्याच्या पाण्या चा कायमस्वरूपी मार्ग काढावा व पिण्याच्या पाण्याची नागरिकांची गैरसोय टाळावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून केली जात आहे
