
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यात जिल्हा अधिकारी यांचा दौरा सदर दौऱ्या दरम्यान राळेगाव तालुक्यातील सावंगी पेरका,वाढोणा बाजार, खडकी, वडकी गावाला धावती भेट देऊन पी.एम.किसान केवायसी आढावा, पिक पाहणी आढावा, Land data details बाबत आढावा व मतदार यादी आधार सिडिंग आढावा घेण्यासाठी राळेगाव तालुक्यातील वरील गावाला जिल्हा अधिकारी अमोल येडगे यांनी धावती भेट देऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत सदर भेटी दरम्यान राळेगाव उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, तहसीलदार डॉ. रविंद्र कानडजे, गटविकास अधिकारी पवार ,मंडळ अधिकारी पोटे, तलाठी गिरीश खडसे, सचिव ढगे, महसूल विभाग व पंचायत विभागा सह तालुक्यातील बरेच अधिकारी उपस्थित होते.
