
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कलावंत वारकरी सेवा विकास व सन्मान संस्था, महाराष्ट्र राज्य या सामाजिक, सांस्कृतिक व वारकरी चळवळीत कार्यरत असलेल्या संस्थेमध्ये युवकांना संघटित करून समाजहितासाठी कार्य करण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली आहे.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. ॲड. श्याम खंडारे यांच्या आदेशानुसार तालुका युवक आघाडी प्रमुख या पदावर निखिल प्रदीपराव इंगोले (मु. पिंपरी – इंगोले) यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली.
निखिल इंगोले हे सामाजिक, सांस्कृतिक तसेच वारकरी विचारधारेत सक्रिय सहभाग घेणारे युवक असून त्यांनी यापूर्वीही विविध सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान दिले आहे. युवकांना योग्य दिशा देणे, समाजप्रबोधन, वारकरी संस्कृतीचा प्रसार, तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचे प्रचार-प्रसार करण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे.
या नियुक्तीमुळे तालुका स्तरावर संस्थेचे कार्य अधिक गतिमान होईल, युवक वर्ग मोठ्या प्रमाणात संस्थेशी जोडला जाईल आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमांना बळ मिळेल, असा विश्वास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
निखिल इंगोले यांच्या निवडीबद्दल संस्थेच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व वारकरी संप्रदायातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
