
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगांव तालुक्यातील श्रीरामपूर येथील शेतकरी किसन शंकर भुसेवार वय ४० वर्षीय शेतकऱ्यांनी दिं २० फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
किसन भुसेवार या शेकऱ्यांकडे ४ एकर शेती असून यावर्षी शेतात लागवड केलेला खर्चही निघला नसून खाजगी तसेच बँकेच्या कर्जाची परतफेड करावी कशी या चिंतेत नेहमी असायचे त्यामुळे शेवटी त्यांनी दिं २० फेब्रुवारी २०२३ रोजी किसन भुसेवार यांनी विष प्राशन करून आपली जीवन यात्रा संपविली आहे.त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले असा मोठा आप्त परिवार आहे.
