
सहसंपादक : रामभाऊ भोयर
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या प्रांतिक कार्यकारणीच्या आदेशानुसार विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने आज शिक्षण अधिकारी माध्यमिक कार्यालयासमोर दिनांक 10/3/2026 रोजी दुपारी ठिक तीन ते पाच वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या 45 मागण्यांचे निवेदन शासनाला पाठवण्यात आले.
निवेदन स्वीकारण्यासाठी शिक्षण अधिकारी कार्यालयाच्या वतीने उपशिक्षणाधिकारी सौ नाईक मॅडम व रत्ने मॅडम यांनी आंदोलन स्थळाला भेट दिली व संघटनेचे निवेदन स्वीकारले .
या आंदोलनाला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतिक अध्यक्ष अरविंद देशमुख जिल्हा अध्यक्ष पवन बन जिल्हा कार्यवाह रामकृष्ण जीवतोडे मुख्याध्यापक संघाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्रकाश भुमकाळे ,भूमन्ना भूमकंटीवार , शिक्षक महामंडळाचे कार्यकारिणी पदाधिकारी आनंद मेश्राम सर,महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाच्या महिला प्रतिनिधी सौ संध्या जिरापुरे सदस्य विमाशीचे जिल्हा कार्याध्यक्ष विजय खरोडे मार्गदर्शक मनोज जीरापुरे उपाध्यक्ष साहेबराव धात्रक ,श्रावणसिंग वडते ,श्याम बोंडे, अशोक अकूलवार सर ,श्रीकांत अंदुरकर सहकार्यवाह विठ्ठल परांडे ,गजेंद्र काकडे ,उमाकांत राठोड, नरुले सर, प्रदीप टोणे , वाघमारे सर,अरूण गारघाटे, विजय गौरकार , रासमुडगुलवार सर कावळे सर खंडारे सर बागडे सर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते
जिल्हाध्यक्ष पवन बन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या आंदोलनाचे प्रस्ताविक जिल्हा कार्यवाह रामकृष्ण जीवतोडे सर यांनी केले तर संचालन विजय खरोडे यांनी केले.
या आंदोलनामध्ये शासन स्तरावर करायच्या 45 मागण्या सोबतच जिल्हास्तरावरील मागण्यांवर सुद्धा चर्चा करण्यात आली
त्यामध्ये विदर्भ माध्यमिक शिक्षक संघा कडून 31 मार्च पर्यंत जिपीएफ स्लिप देण्याची आग्रही मागणी करण्यात आली 31 मार्चपर्यंत जिपीएफच्या पावत्या न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला.त्याचप्रमाणे थकीत बिला मध्ये येणाऱ्या त्रुटीवर सुद्धा चर्चा करण्यात आले.या धरणे आंदोलनाला मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसून आली.
